मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हनुमाननगर ग्रामपंचायत सहभाग ३१ मार्च पर्यंत काम पूर्णत्वाचे लक्ष.
प्रतिनिधी= गणेश ठाकरे लासलगाव
मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत हनुमाननगर येथे विकास कामांना गती मिळावी असून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतचे तसेच अभियानाचे सर्व घटकांची कामे पूर्णत्वास आले आहे जिल्हा परिषद नाशिक चे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.ओमकारजी पवार सर यांच्या संकल्पनेतून तसेच मा.उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचाय विभाग श्रीमती. वर्षा फडोळ जि.प.नाशिक तसेच गट विकास अधिकारी निफाड श्रीमती.नम्रता जगताप मॅडम तसेच विस्तार अधिकरी पवार सो.बोरसे सो,थोरात सो, प.स.निफाड यांचे मार्गदर्शनाखाली हनुमाननगर येथे नविन अभ्यासिका तयार करण्यात आली आहे त्याचा गावातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच शालेय विध्यार्थ्यांना अभ्यासाकरिता लाभ होत आहे तसेच गावपातळीवर आभ्यासिका सुरु झाल्याने विध्यार्थ्यानचा वेळ व पैसा बचत होत आहे तसेच गावातील नागरिकांसाठी ग्रीन जिम, नाना नाणी पार्क, तसेच १०० मीटरचा रनिंग व जॉगींग ट्रॅक युवकांसाठी तयार करण्यात आला आहे
,महिलांसाठी स्वतंत्र माहेरचा कट्टा , आरोग्य तपासणी कामी स्वतंत्र रूम तयार करणे तसेच लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्ष लागवड व संगोपन सौर उर्जेच्या माध्यमातून अपारंपरिक उर्जेचा वापर वाढवणे करिता सोलर मोटर पंप,सोलर हिटर,सोलर लाईट,घनकचरा व्यवस्थापनामध्ये ओला व सुका कचरा कुंड्या तसेच कंपोष्ट टाकी व गांडूळ खत खड्डा करणे तसेच सांडपाणी व्यवस्थापनामध्ये भूमिगत गटार ,शोषखड्डे तसेच सार्वजनिक इमारतींना रेन वाटर हार्वेस्टिंग करणे, सुसज्ज व सुविधा युक्त स्मशानभूमी तसेच व्यायामशाळा , अंगणवाडी,जि प शाळा ,ग्रामपंचायत कार्यालय सर्व सुविधापूर्ण अद्यावत करण्यात आलेले आहे तसेच सर्व शासकीय विभागांचे लेखे अद्यावत करणे, कर वसुली करणे, दिव्यांग बांधव खर्च, महिला बालकल्याण खर्च तसेच मागासवर्गीय खर्च १००% करण्यात आलेला आहे.ग्रामसभा ,वार्डसभा,महिला सभा तसेच मुलींच्या जन्माचे स्वागत तसेच मयत व्यक्तीची आठ्वन स्मरणात राहणेचे दृष्टीने वृक्ष लागवड करणे , आरोग्य तपासणी मोहीम आयुष्मान भारत कार्ड शंभर टक्के काढणे, बचत गट मार्फत महिलांना मार्गदर्शन लखपती दीदी बँक मार्फत कर्ज वाटप अनिमिया तपासणी , रक्त दान शिबीर , वैयक्तिक लाभाचे योजना जनजागृती ,रोजगार हमी योजनेची विकास कामे ,लोक सहभागातून रस्ता दुरुस्ती करणे तसेच धार्मिक स्थळे स्वच्छता व सुशोभिकरण करणे अशी विविध विकास कामे अभियान कालावधीत पूर्ण करण्यात आली असून गावाने अभियान यशस्वी रित्या पूर्ण केले आहे ,
गावात अभियांमुळे लोकसहभाग वाढला आहे ,अभियान यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी या महत्त्वकांक्षी योजनेबद्दल गावातील नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त करत सुरक्षित व सन्मानपूर्वक जीवनाकडे गावाने टाकलेले हे पाऊल असल्याचे मत व्यक्त केले ,अभियान यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी हनुमाननगर ग्रामपंचायतचे सर्व माजी सरपंच,उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य ,पोलीस पाटील श्री अमोल गुंजाळ ,गावातील जेष्ठ ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच तरून मित्र मंडळी, महिला वर्ग तसेच प्रशासक श्री.ज्ञानेश्वर माधवराव शिंपी तसेच ग्रामपंचायत अधिकारी श्री.किरण जयराम क्षिरसागर ,ग्रामपंचायत कर्मचारी श्री.अशोक दरेकर,श्री.ज्ञानेश्वर भडांगे श्री.सागर गुंजाळ श्री.पवन देवकर,जी प शाळा मुख्याध्यापक ,शिक्षक ,आशा सेविका ,मदतनीस , CRP मॅडम, महिला बचत गट, ग्रामसंघ सदस्य, यांनी अभियान यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले , तसेच सर्व नागरिकांनी बहुमोल योगदान दिले व गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वीरीत्या पार पाडले .

No comments:
Post a Comment