रामराव वडकुतेंच्या उमेदवारीचे आ. संतोष बांगर यांनी केले स्वागत




प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

: राज्यसभेसाठीरामरावजी वडकुते यांना मतदान करण्याची संधी मिळाल्यास आपल्याच माणसाला मतदान केल्याचे समाधान मिळेल' असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांनी  बोलताना सांगितले

रामरावजी वडकुते हे शेतकरी, कष्टकरी समाजाचेप्रतिनिधी असून राज्यातील समस्त ओबीसी समाजाचे नेते आहेत. भारतीय जनता पक्षाने राज्यसभेसाठी अत्यंत योग्य उमेदवाराची निवड केली असल्याचे मत आ. संतोश बांगर यांनी व्यक्त केले. केंद्र शासनाशी संबंधित हिंगोली जिल्ह्यातील विषय राज्यसभेत मांडण्यासाठी जिल्ह्याला सुद्धा एक हक्काचा माणूस मिळाला असल्याचे सर्वांनाच समाधान असल्याचेही ते म्हणाले

No comments:

Post a Comment