वरीष्ठ लिपीक संजयजी वैद्य सर यांचा सेवापुर्ती दिना निमित्त सत्कार ..

 


प्रतिनिधी गजानन चव्हाण 

अंबामाता विदयालय गोरेगाव चे श्री संजयजी रामराव वैद्य सरांचा सेवापुर्ती दिना निमित्त विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला,त्यांनी  1993 मध्ये  अंबामाता विद्यालय गोरेगाव (पु. म.) ता. मु्तिजापूर जि. अकोला या विना अनुदानित संस्थेवर लिपिक म्हणून  काम करत,आपल्या नौकरीची सुरवात करून, सुरवातीला विद्यालयामध्ये शिक्षक कमी असल्यामुळे  8 ते 10 वर्ष त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवले व  सोबतच  लिपिक म्हणून काम केले असा हा 33 वर्षाची नौकरीचा प्रवास सरांनी आपल्या जिवनात केला,  सर मुळचे धानोरा वैद्य ता. मूर्तिजापूर जि. अकोला येथील रहिवासी,सरांनी ज्या विद्यालयामध्ये नौकरी केली ते विद्यालय पुढे नेण्यासाठी सर व शिक्षक अशोकराव खंडारे सर यांचे मोलाचे योगदान आहे, त्यांनी सोबतीला असणारे शिक्षक,विद्यार्थी, पालक वर्ग व गावकरी,मंडळीशी आदराचे नाते संबध जुडविले,विशेष म्हणजे त्यांनी  अतिशय चांगले कर्तव्य पार पाडले,गावातील लहान मोठे सर्वांशी आदराचे नाते तयार केले होते, सर्व सहकारी सदस्य त्यांचे आवडते होते ,असे हे वरीष्ठ लिपीक दि.31/01/2026 रोजी सेवानिवृत्त  झाले,त्यांचा सेवापुर्ती दिन सोहळा हा विद्यालया कडून अंबामाता विदयालय गोरेगाव येथे आयोजित केला होता  ,या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवानंदजी मुसळे मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे  संगीतजी कांबे संस्था अध्यक्ष, गायत्रीजी कांबे सचिव, विशेष उपस्थिती, अंनतरावजी राऊत गोपाळरावजी ढेंगे, नंदूजी कोगदे, श्री पाटेकरजी,अनिलजी सोनोने, अमृतरावजी दराडे, विद्यालयाचा पाहिला विद्यार्थी युसूफजी अली, व विद्यार्थी  हजर होते .अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी  वैद्य सरांचा शाल,श्रीफळ, व परमहंस गोरेगाव नगरीचे आराध्य दैवत पुंडलिक महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार केला, सर्व मान्यवरानी  सरांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,सरांनी आपल्या भाषणात आपल्या सेवा काळात मी चांगली नौकरी करून सेवानिवृत्त होत आहे मी खुप समाधानी आहे असे म्हणत माझ्या पत्नीने, मुलाने व कुटूंबाने मला आजपर्यंत भरपूर साथ दिली व मला त्यांचा अभिमान आहे व त्यांच्या मुळेच मी आता पर्यंत चांगली नौकरी करून या ठिकाणा पर्यंत पोहचलो असे भावनिक उदगार काढले, व त्यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंतजी राऊत सरांनी तर आभार बाप्पुरावजी गावंडे सरांनी केले

.

No comments:

Post a Comment