रिपाई शिंदे सेना सोबत
प्रतिनिधी -मोहसीन इनामदार
5 फेब्रुवारी 2026 जत रिपाई ला भाजपने योग्य सन्मान न दिल्यामुळे रिपाई ने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला असल्याची माहिती रिपाई चे प्रदेश सचिव संजय कांबळे यांनी जत येथे आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत केला . यावेळी शिवसेनेचे सांगली जिल्हा प्रमुख संजय विभुते , तालुका प्रमुख अंकुश हुवाळे , शिवसेना जत शहर प्रमुख प्रमोद सावंत , रिपाई चे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे तालुका , तालुका अध्यक्ष संजय कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्तित होते. यावेळी रिपाई चे प्रदेश सचिव संजय कांबळे म्हणाले कि 2014 पासून रिपाई भाजप सोबत असून भाजप ने मात्र रिपाई चा योग्य सन्मान राखला नाही.
त्यासाठी आम्ही शिवसेना शिंदे गटाबरोबर युती करत आहोत . जत तालुक्यातील विविध प्रश्न सोडवण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले असून शेतकऱ्यांचे प्रश्न असो , दलित वस्तीसाठी निधी असो , जत शहरासाठी निधी असो हे सर्व निधी उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आणू असे शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष संजय विभुते यांनी सांगितले आहे . या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप व महाविकास आघाडी ला रिपाई ची ताकत दाखवू असे रिपाई चे प्रदेश सचिव संजय कांबळे यांनी सांगितले आहे

No comments:
Post a Comment