किनवट पोलिसांची धडक कारवाई मासरेड 36.480 रुपयांचे माल जप्त



दै. दर्पण किनवट प्रतिनिधी शेख आमिरपाशा 

किनवट पोलिसांची धडक कारवाई मासरेड कारवाई दरम्यान किनवट पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्याच्या विरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात आली पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन कारवाई करण्यात आली एका कारवाईत हातभट्टी चे रसायन तर दुसरी कारवाईत अवैध देशी दारू या दोन कारवाईत एकूण अंदाज ३६.४८० हजार रुपयांच्या माळ जप्त करण्यात आला दोन ही आरोपीं वर गुन्हे दाखल करण्यात आले पहिली कारवाईत मिळालेल्या माहिती नुसार किनवट येथील मोजे धामणदरी येथे धाड टाकली असता अंदाजे ७०० लिटर हातभट्टी गावठी दारू तयार करण्याचे मोहफुल रसायन असा एकूण ६५००० हजार रुपयांच्या मुद्देमाल मिळून आले आहे. लक्ष्मण सिताराम कुसराम वय ४५ वर्ष व्यवसाय मजुरी राहणार धामणदरी दुसरी कारवाई तसेच गोकुंदा येथे एकुण १४८० रू ची देशी दारू अवैध रित्या विक्री करताना मिळुन आले

आरोपी शेख अकबर शेख अहमद वय ३० वर्ष राहणार गोकुंदा तालुका किनवट यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्याची प्रक्रिया सुरू आहे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली कारवाई पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे पूर्णपणे मोडीत करण्याच्या इशारा पोलिसांनी दिलेला आहे


No comments:

Post a Comment