निचपुर गावातील संपूर्ण महिलांनी पुढाकार घेऊन अवैध दारू विक्री व धंदे तात्काळ बंद करा



दै. दर्पण प्रतिनिधी शेख अमीरपाशा

किनवट तालुक्यातील निचपुर व राजगड गावांमध्ये तालुक्यामध्ये देशी दारू,हातभट्टी,अवैद्य धंद्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. निचपुर गावातील संपूर्ण महिलांनी पुढाकार घेऊन दारू विक्री व अवैध धंदे तात्काळ बंद करा म्हणून दुसऱ्यांदा पोलीस स्टेशन किनवट येथे अर्ज दिला. गेल्या काही दिवसांमध्ये निचपुर गावामध्ये अवैध धंदे व दारू विक्रीचे मोठ्या प्रमाणात चालू आहे.गावामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडली असून गावातील महिलांची सुरक्षा, भांडण, ताण तणाव व तरुण पिढीचे आयुष्य धोक्यात आहे. या सर्व बाबीची दखल घेऊन निचपुर गावातील अवैध धंदे व दारू विक्री कायमस्वरूपी बंद करावी व 

 अवैद्य धंदे,गावठी दारू,देशी दारू विक्रेत्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करा अशी मागणी केली आहे. अगोदर ०२/०१/२६ रोजी दिलेल्या अर्जाची किनवट पोलीस प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नसल्या कारणाने ०४/०२/२६ रोजी दुसरा अर्ज पोलीस स्टेशन किनवट येथे देण्यात आला आहे या विषयावर पोलीस प्रशासन लक्ष द्यावे

No comments:

Post a Comment