तालुका भूमिपुत्र संतोष तायडे अमेरिकेत करणार मेराथॉन चे नेतृत्व त्या निमित सत्कार करून केले कौतुक .

 


प्रतिनिधी गजानन चव्हाण 

मुर्तिजापुर तालुक्यातील उनखेड . येथील भूमिपुत्र माजी सैनिक वय वर्ष 48 संतोष तायडे  यांनी दिल्ली येथे  झालेल्या 42 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा  पूर्ण करत अमेरिकेतील बोस्टन मॅरेथॉन स्पर्धा मध्ये  संतोष तायडे  यांची निवड झाली असून अकोला जिल्ह्याचे नाव लौकीक करत मोठा  इतिहासात घडवला हि गोष्ट आपल्या करीता तथा जिल्हा करिता मोठी गौरवाची बाब आहे संतोष तायडे हे उनखेड तालुका मुर्तिजापूर  येथील रहिवासी असून नागपूर येथे सुरक्षा रक्षक सेवेत कार्यरत आहेत या कठीण काळात आपल्या सरावाच्या जिद्दीने दिल्ली येथे पार पडलेल्या ए डी एम  इंडियन मॅरेथॉनच्या मध्ये 42 कि मि अंतर अवघ्या 3  तास 06 मिनिटे 52  सेकंदात  पूर्ण केले आहे या कामगिरी मुळे त्यांना जगातील नामकींत अमेरिका बोस्टन येथे  महत्त्वाचे स्थान मिळाले आहे आपल्या जिल्ह्याचे नावलौकिक केल्यामुळे त्यांचा मेजर फिजिकल अकॅडमीचे मेजर  मंगेश तेलमोरे व  मेरा युवा  भारत  तालुका समन्वयक विलास एम . वानखडे सचिन धोटे सह पोलीस भरती प्रशिक्षणार्थ युवा व युवती सह सर्वानी मेजर संतोष तायडे यांची  अमेरिकेत होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेकरिता निवड झाली त्या मुळे त्याचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ  देऊन  अभिनंदन करून   पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या  मेजर तायडे यांनी  फिटनेस विषयी मोलाचे मार्गदर्शन केले 

कार्यक्रमाचे  संचालन भोला  चव्हान यानी केले तर आभार  आचल गवई   यानी केले .

No comments:

Post a Comment