फुले विद्यालयात श्रीमती सुवर्णलता व्ही. बलखंडे यांचा भावनिक सेवापूर्ती समारंभ


दिनेश पत्की कळमनुरी 

कळमनुरी येथील महात्मा फुले विद्यालयात कार्यरत असलेल्या श्रीमती सुवर्णलता विश्वनाथ बलखंडे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त शनिवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात सेवापूर्ती समारंभ पार पडला. मुख्याध्यापक तान्हाजीराव जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शाळा समितीचे अध्यक्ष मा. अॅड. अशोकराव सावंत साहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. शरदभाऊ सावंत तसेच कार्याध्यक्ष मा. डॉ. वसंतराव पतंगे साहेब उपस्थित होते.


संघर्षातून घडलेले कर्तृत्व

अध्यक्षीय भाषणात अँड. अशोकराव सावंत म्हणाले, "बाईमुळे घराला घरपण असते; तर कार्यालयाची शान ही सेवकांच्या प्रामाणिक कामावर अवलंबून असते. ही बाब श्रीमती सुवर्णलता बलखंडे यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केली." सत्काराला उत्तर देताना सुवर्णलता ताईंनी भावनावश होत सांगितले, "संघर्षाची फळे आज गोडीने चाखताना या मातीने दिले." मला भरभरून प्रमुख वक्ते व्ही. एस. डेंगळे यांनी त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा उल्लेख करताना सांगितले की, पतीच्या निधनानंतर त्यांनी जिद्दीने संसार उभा केला व मुलांना शिक्षणाच्या बळावर सक्षम केले. अशोकसिंह ठाकूर यांनी कर्म-कर्तव्याच्या संगतीचा संदेश देत त्यांच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले, मा. प्रा. राजारामजी बनसकर यांनी हा निरोप सोहळा म्हणजे "दुसरा आई महोत्सवच" असल्याचे गौरवोद्गार काढले.

मा. प्रा. लक्ष्मणराव शिंदे यांनी विद्यालयातील पहिल्या महिला सेविका म्हणून त्यांना मिळालेल्या सन्मानाचा उल्लेख करत त्यांच्या संघर्षातून उभ्या राहिलेल्या आयुष्याचे कौतुक केले. मा. प्रा. आनंद पारटकर यांनी सुपुत्र विनोद यांच्या शैक्षणिक यशाचा उल्लेख करत दिवंगत सावंत काकांना अभिमान वाटला असता, असे सांगितले,

कुटुंबाचा अभिमान, विद्यालयाचा सन्मानसुपुत्र विनोद व्ही. बलखंडे यांनी मनोगतात सांगितले, "आईच्या सावलीत १५ पदव्या घेत संविधानावर पीएचडी करत आहे; ही फुले विद्यालयाच्या मातीची ताकद आहे." प्रा. अनिता देशमुख मॅडम यांनी त्यांच्या सेवाभावाची गोडी 'चहाच्या गोडव्याशी' तुलना करत भावपूर्ण आठवणींना उजाळा दिला.

सेवानिवृत्त लिपिक भागवतराव शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबाच्या फॅमिली पेन्शनपरंपरा प्रकरणातील अनुभव सांगत ताईंच्या सलोख्याच्या स्वभावाचे कौतुक केले. अशोकराव भोसले यांनी सुरुवातीच्या काळात भावाची भूमिका बजावल्याचे नमूद केले. सन्मानाची कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर सुवर्णलता बलखंडे ताईंना साडी-चोळी, शाल, सन्मानचिन्ह व भव्य पुष्पहार देऊन गौरविण्यात आले. बलखंडे कुटुंबीयांनीही मंचावरील सर्व मान्यवरांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत गरड यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनिल ठाकरे यांनी केले. छायांकन गोविंद बंडे यांनी केले. कार्यक्रमानंतर आगलावे यांच्या नियोजनात बलखंडे कुटुंबीयांतर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात आली. श्रीमती सुवर्णलता व्ही. बलखंडे यांच्या सेवाकाळाचा प्रवास हा संघर्ष, कर्तव्यनिष्ठा आणि मातृत्वाच्या सामर्थ्याचा प्रेरणादायी आदर्श ठरला असून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.


No comments:

Post a Comment