पंचायत प्रगती निर्देशांकात (PAI) राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त निफाड तालुक्यातील सोनेवाडी खुर्द ग्रामपंचायतीचा गौरव
पंचायत प्रगती निर्देशांक (Panchayat Advancement Index) म्हणजे (PAI)
प्रतिनिधी. : गणेश ठाकरे लासलगाव
प्रशासन: ग्रामपंचायतीच्या प्रशासनिक कार्यक्षमता आणि पारदर्शकता - विकासकाम: ग्रामपंचायतीने केलेल्या विकासकामांची गुणवत्ता आणि परिणामकारकता-.नागरिक सहभाग: ग्रामपंचायतीच्या कामकाजात नागरिकांचा सहभाग आणि त्यांच्या मागण्यांचे समाधान- आर्थिक व्यवस्थापन: ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवस्थापनाची गुणवत्ता आणि पारदर्शकता याच बरोबर पंचायत प्रगती निर्देशांकामध्ये मूल्यांकन केल्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत निफाड तालुक्यातील सोनेवाडी खुर्द ग्रामपंचायतीने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाबद्दल नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार साहेब, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा पडोळ मॅडम उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) महेश पाटील साहेब,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीमती नम्रता जगताप,सहा.गटविकास अधिकारी सुनिल पाटील विस्तार अधिकारी संजय पवार, प्रशांत बोरसे, राजेश थोरात यांनी अभिनंदन केले
ग्रामपंचायतचे सरपंच लता आव्हाड उपसरपंच योगिता गायकवाड, सदस्यअशोक आव्हाड, पंडित मोरे, प्रकाश बांगर , छाया सानप, नंदा सानप, सपना सानप, तसेच ग्रामपंचायत अधिकारी आम्रपाली देसाई, कर्मचारी नंदू सानप व अरुण सानप यांनी परिश्रम घेतले. तसेच निवड झाल्याने सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

No comments:
Post a Comment