देवगाव येथे विहिरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ....



प्रतिनिधी = गणेश ठाकरे लासलगाव 

निफाड तालुक्यातील देवगाव येथील सचिन विठ्ठल बोचरे (वय २५) यांचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार, सचिन बोचरे हे त्यांच्या राहत्या घराजवळील विहिरीवर जनावरांसाठी पाणी काढत असताना त्यांचा पाय घसरून ते विहिरीत पडले. पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना समजताच गावात शोककळा पसरली.

सचिन बोचरे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असूनही ते कष्टाळू व मदतीस तत्पर म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनामुळे गावकऱ्यांकडून तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सदर घटनेची माहिती पोलीस पाटील सुनिल बोचरे यांनी पोलिसांना दिली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदिप शिंदे व औदुंबर मुरडणर करीत आहेत.

No comments:

Post a Comment