शिवजयंतीचा अभूतपूर्व जल्लोष बाल – गोपालांच्या मिरवणुकीने अवघे कळमनुरी शहर झाले 'शिवमय'
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
रयतेच राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कळमनुरी शहरात उसाहात, भक्तिभावाने आणि मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली यानिमित्ताने शहरात भाव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे सकाळपासूनच संपूर्ण परिसरातील वातावरण शियमय शाले होते. शहरातील विकठिकाणचे रस्ते भगवे ध्वज आणि फुलांच्या आकर्षक सजावटीने न्हाऊन निघाले होते. नागरिकांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमांना पुष्कार अर्पण करून मोठ्या अभिमानाने अभिवादन केले.
या भव्य सोहळ्यात कळमनुरी शहर आणि परिसरातील कष्टकरी शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, युवक-युवती, तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण मिरवणूक मार्गावर जय भवानी, जय शिवाजी च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.
या जयंती सोहळ्याचे मुख्य आकर्षण उत्स्फूर्त शालेय सहभाग, मोधे सैनिकी शाळेचे विद्यार्थी आणि आत्मज विद्यामंदिराच्या विद्यार्थी आत्मज विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनि शिवकालीन इतिहासाचे जिवंत दर्शन घडवत या विद्यार्थ्यांनी बाल जिजाऊ, बाल शिवराय, मावळे आणि विविध पथनाट्ये सादर करून उपस्थितप्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच या देखाव्याचे भरभरून कौतुक केले. मिरवणूकीत ढोल-ताशे, नगारे वाद्यवृंद तसेच वासुदेव साभाळ यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले होते. डोल-ताशांच्या गजरात
तरुणांनी पारंपरिक लेझीम, फुगडी आणि आणि दोलकी नृत्य सादर करत मिरवणुकीत मोठी रंगत आणली, महिला भजनी मंडळी नी आपल्या भजन-कीर्तनाच्या माध्यमातून महाराजांच्या पराक्रमाची आणि स्वराज्याच्या संकल्पनेची महती सांगत सामाजिक सलोखा व राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला.
हा संपूर्ण सोहळा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले होते. त्यांच्या चोख नियोजनामुळे मिरवणुकीत कुठेही अडथळा निर्माण झाला नाही. या भव्य मिरवणुकीची सांगता कळमनुरी नगरपरिषद येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

No comments:
Post a Comment