जि. प शाळा सालतवाडा येथे प्रजासत्ताक दिन उत्सहात साजरा.



प्रतिनिधी गजानन चव्हाण 

ग्राम सालतवाडा येथील जि. प. शाळेमध्ये  भारताचा 77 व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष करिष्माताई शिराळे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती  तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सिमाताई जामनीक सरपंच सालतवाडा, ग्रामसेवक डुके मॅडम, प्रदीप वानखडे सदस्य संदीप वानखडे, रेखाताई नागे  सदस्य, शिवाजी जवंजाळ, मधुकर चहाकार,देवानंद जामनिक पत्रकार, डॉक्टर  आरोग्य विभागातील कर्मचारी व सर्व सदस्य मंडळी, मुख्याध्यापक सारसेसर, डाबेरावसर, सोळंकेसर, वानखडे मॅडम, वरघट मॅडम, अरज ताई हजर होते,  शाळेचे मुख्याध्यापक सारसे सर यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करीत अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, तसेच विद्यार्थी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये देशभक्ती गीत, तसेच मराठी गीत, हिन्दी गीत यांच्यावर चांगले नृत्य करून उपस्थिताचे मनोरंजन केले,यावेळी  श्री आईबाबा बहुउद्देशिय संस्था सालतवाडा कडुन जिल्हा परिषद  शाळेला वाटर फिल्टर  व 5001रु. नगदी देणा-या मिराताई राजेंद्र बोंडे संस्थेच्या उपाध्यक्ष व स्त्री शक्तीपुरस्कार प्राप्त यांचा शाळे मार्फत सत्कार करत,व जि. प.शाळा सालतवाडासाठी महत्वाचे योगदान देणारे छत्रपती शिवाजी महाराज समाजभुषण पुरस्कार प्राप्त गजानन चव्हाण  यांचा सत्कार करण्यात आला,या कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, व गावकरी मंडळी तरुण मंडळी  यांनी परिश्रम घेतले, व कार्यक्रमाला गावातील  महिला,पुरुष,तरूण,लहान,मोठे हजर होते,


No comments:

Post a Comment