न्यू इंग्लिश स्कूल मध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी : गणेश ठाकरे लासलगाव
येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सचिव डॉ. सौ. शितल पवार यांचे शुभेहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थितांनी राष्ट्रगीताला मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी 'विजयी विश्व तिरंगा प्यारा' हे ध्वजगीत व 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत गायिले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक नारायण शिंदे मीना जैन,गोकुळ महाले, बबन खांडबाहले, ज्ञानेश्वर कापसे, अशोक साळवे, दिव्या वाघ, योगिता दाते, सचिन तिदमे आदी पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे संविधानाचे प्रास्ताविक - आम्ही सा भारताचे लोक याचे वाचन केले. विद्यालयातील शिक्षिका हर्षदा सोनोने यांनी असाक्षर मुक्त गाव प्रतिज्ञेचे वाचन केले. शाळेतील विध्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्वक देशप्रेम भाषणातून व्यक्त केले.
यावेळी सहावीतील विध्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर करून उपस्थितांना त्यांच्या शालेय जीवनाची आठवण करून दिली. इयत्ता पाचवीतील विध्यार्थ्यांनी डंबेल नृत्य सादर केले. इयत्ता सातवी ते नववीतील विध्यार्थ्यांनी 'ऑपेरेशन सिंदूर' हे नाटक सादर केले.
मीना जैन यांनी विध्यार्थ्यांना संविधानाचे महत्व सांगून विध्यार्थ्यांना सेनादलातील जवानांचे जीवनशैली सांगून जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले.यावेळी डॉ. शितल पवार यांनी विध्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानामुळे महिलांचे सर्वच क्षेत्रात सबलीकरण झाल्याचे सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केलेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीतांजली शिरसाठ यांनी त्यांच्या खास शैलीत केले. शेवटी 26 जानेवारी रोजी वाढदिवस असलेल्या विध्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन खाऊ वाटप करून वंदेमातरम या राष्ट्रगानाने कार्यक्रमाची सांगता झाली.संपूर्ण कार्यक्रम नियोजनानुसार उत्साहात व शिष्टबद्ध वातावरणात पार पडला

No comments:
Post a Comment