महागाव मध्ये मध्यरात्री थरार उपनगराध्यक्ष सहकुटुंबाचे बंदुकीच्या धाकावर अपहरण




 महागाव प्रतिनिधी अक्षय डोंगरे 

शिवसेना उपजिल्हाप्रमुख महागाव नगरपंचायतचे उपनगरध्यक्ष प्रमोद उर्फ शाखा भरवाडे यांच्यासह त्यांचे पत्नी आणि दोन मुलीचे राहत्या घरातून अपहरण झाल्याची धक्कादायक घटना 5 फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली आहे अज्ञात आरोपींनी देशी कट्ट्यांचा धाक दाखवून भरवाडे कुटुंबांना त्यांच्याच कारमध्ये पळून नेल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे शिवसेना उबठा उपजिल्हाप्रमुख तथा महागाव नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष शाखा भरवाडे यांचे भाऊ सचिन भरवाडे यांनी याप्रकरणी यांनी याप्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे

 गुरुवारी रात्री संपूर्ण कुटुंब जेवण करून झोपले असता ठीक मध्यरात्री 2 च्या सुमारात दोन अज्ञात व्यक्तींनी घराचा दरवाजा ठोकावला सचिन भरवाडे यांनी दरवाजा उघडला असता आरोपींनी "पोलीस स्टेशनचे काम आहे" दरवाजा उघडा असे सांगून घरात प्रवेश केला सचिन यांनी त्यांचा मोठा भाऊ प्रमोद यांना उठवताच आरोपींनी आपले हिंसक रूप धारण केले एका आरोपीने प्रमोद भरवाडे यांना धक्काबुक्की केली तर दुसऱ्या नेत्यांची मोठी मुलगी वैष्णवी तिच्यावर देशी कट्टा रोखून हालचाल केल्यास ठार मारण्याची धमकी दिली दहशतीचे वातावरण निर्माण करून आरोपींनी शाखा भरवाडे त्यांची पत्नी प्रियंका भरवाडे आणि दोन मुलींना घरासमोर उभे असलेल्या स्विफ्ट डिझायर कार मध्ये (क्रमांक एम एच 46 एन ६८ ३९) या क्रमांकाच्या कार मध्ये जबरदस्तीने बसवले विशेष म्हणजे आरोपींनी शाखा भरवाडे यांनाच गाडी चालवण्याचा भाग पाडले "पोलीस स्टेशनला कळव ले तर जिवावणे मारू आमचे काम झाले की चार दिवसांनी यांना सोडून देऊ" अशी धमकी देऊन आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला या घटनेमुळे महागाव शहरात भीतीचे सावट पसरले असून पोलिस आता आरोपीचा आणि फक्त कुटुंबाचा कसून शोध घेत आहे


No comments:

Post a Comment