कळमनुरी शहरात सफाई व विकासकामांचा अभाव
प्रतिनिधी दिनेश पत्की
कळमनुरी : कळमनुरी शहरात नव्याने नगरपरिषद स्थापन होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेला असला तरी अद्याप शहरात कुठल्याही प्रकारची नियमित सफाई किंवा विकासकामे सुरू झालेली दिसून येत नाहीत. रस्त्यांवरील कचरा, नालेसफाईचा अभाव, अस्वच्छता आणि रखडलेली मूलभूत कामे यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नगरपरिषदेची सत्ता शिवसेना शिंदे गटाकडे संपूर्ण असतानाही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांबाबत उदासीन असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. शहरातील अनेक भागांत कचऱ्याचे ढिग, दुगंर्धी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढत असून आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते
नगरपरिषद स्थापन होताच शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र प्रत्यक्षात एकाही ठोस विकासकामाला सुरुवात न झाल्याने सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सत्ता असूनही कामे होत नसतील, तर जबाबदार कोण? असा सवाल आता जनतेमधून उपस्थित केला जात आहे. जर लवकरात लवकर सफाई व विकासकामे सुरू झाली नाहीत, तर नागरिकांकडून आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल, असा इशाराही काही सामाजिक कार्यकत्यांनी दिला आहे. कळमनुरी नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शहरातील मूलभूत सुविधा सुरळीत कराव्यात, अशी जोरदार मागणी आहे.

No comments:
Post a Comment