शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांचा वाढदिवस साधेपणाने करण्यात आला.
बार्शी प्रतिनिधी -वैशाली बाबासाहेब ढगे
बार्शी- पाच फेब्रुवारी रोजी बार्शी चे शिवसेना नेता भाऊसाहेब आंधळकर यांचा वाढदिवसाला दरवर्षी सभेचे स्वरूप येत असते भव्यदिव्य स्वरूपात जुना गांधी पुतळा येथे मोठ्या दिमाखात साजरा होणारा वाढदिवस यावर्षी अगदि साधेपणाने साजरा करण्यात आला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मात निधनामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आंधळकर यांनी घेतला परंतु आंधळकर प्रेमींच्या आग्रहास्तव इंदुताई आंधळकर अन्नछत्रालय येथे , अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व नंतर शिवसैनिक व आंधळकर प्रेमींच्या उपस्थितीत अगदी साध्या पध्दतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी त्यांचे सुपुत्र दिपक आंधळकर,बापू तेलंग, शिवसेना शहराध्यक्ष विजय माने,रिक्षा सेना अध्यक्ष बप्पा लावंड,मोहोळ महिला आघाडीच्या शिवसेना शहराध्यक्षा सौ.मुक्ता खंदारे,राधा ननवरे व ईतर शिवसैनिक, पत्रकार बंधू - भगिनी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment