विंचूर ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम...
मुलींना सक्षम करण्यासाठी प्रा. डॉ. वसंतजी हंकारे सर यांचे आयोजित केले व्याख्यान
प्रतिनिधी : गणेश ठाकरे लासलगाव
विंचूर ग्रामपंचायत चे पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी नेहमी वेगवेगळ्या स्वरुपाचे उपक्रम राबवत असते. असाच एक उपक्रम मा. मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकारजी पवार साहेब संकल्पनेतून एकल महिला सन्मान व महिला सक्षमीकरण उपक्रम राबविण्यात येत आहे.तसेच मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना अंतर्गत विंचू येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयांमध्ये श्री प्राध्यापक डॉक्टर वसंत हंकारे सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानात प्राध्यापक हंकारे सर यांनी " बाप समजावून घेताना " या विषयावरती विलोभनीय व हृदयस्पर्शी व्याख्यान दिले.या व्याख्यानात आई-वडिलांचा त्याग त्यांची मेहनत त्यांचे दुःख लपवून आपल्या प्रगतीसाठी त्यांची योगदान अडवून त्यांची जाण कशी ठेवावी ही मोलाची शिकवण प्राध्यापक हंकारे सरांनी दिले.
त्यावेळेस भावनिक होऊन मुली व मुले,पालक यांनी "बाप समजावून घेताना " विषयावर हंबरडा फोडला व उपस्थित सर्वांना यांना अश्रू अनावर झाले. या कार्यक्रमासाठी विंचूर ग्रामपंचायत चे सरपंच सचिन दरेकर उपसरपंच प्रवीण चव्हाण नीरज भट्टड , दत्तात्रय व्यवहारे नानासाहेब जेउघाले राजेंद्र मोरे संतोष जाधव मंगला संजय खैरे शोभा रमेश बोराडे सुमन मधुकर दरेकर प्रीती विनोद गायकवाड इत्यादी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते इम्रान मोमीन विलास गोरे गोरख गांगुर्डे गावातील ज्येष्ठ नागरिक पत्रकार संघ व ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे प्राचार्य देवडे सर , शिक्षकवृंद, कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
विंचूर चे ग्रामपंचायत अधिकारी राघोजी मगर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात ग्रामपंचायत कर्मचारी मयूर खैरे विजेंद्र निकाळे राहुल जाधव राजेंद्र शिंदे मयूर जाधव दत्तात्रय खाडे मनोज चव्हाण यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन व आभार : राजेंद्र चांदे सर यांनी मांडले.

No comments:
Post a Comment