वाळुज गटात महायुतीची प्रचारात आघाडी – राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जोमात
(प्रति. वाळुंज महानगर – पांडुरंग गायकवाड)
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना वाळुज गटात राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या महायुतीने एकत्रितपणे प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.
वाळुज गटातून बालाजी रघुनाथ सोनटक्के हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून घड्याळ या चिन्हावर जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून आशाबाई संजय शिंदे या पंचायत समिती गणातून निवडणूक रिंगणात नशीब आजमावत आहेत. यंदाच्या निवडणुकीत वाळुज गटातील चित्र वेगळे आणि निर्णायक ठरण्याची चिन्हे स्पष्ट आहेत.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिल्याने बालाजी सोनटक्के यांची बाजू अधिक भक्कम झाली आहे. संयुक्त प्रचारामुळे मतदारांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचत असून प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे दिसते.
प्रशासनाची मजबूत पकड, विभागांची सखोल माहिती बालाजी सोनटक्के यांना जिल्हा परिषदच्या प्रत्येक विभागाची सखोल माहिती असून प्रशासनावर त्यांची मजबूत पकड आहे. विकासकामांचा अनुभव, लोकसंपर्क आणि संघटनात्मक ताकद या बळावर वाळुज गटातील सर्वांगीण विकासाला गती देण्याचा त्यांचा ठाम निर्धार आहे. दुसरीकडे, आशाबाई संजय शिंदे या तळागाळातील प्रश्नांशी जोडलेल्या असून महिला, युवक आणि शेतकरी हितासाठी कार्य करण्याची त्यांची स्पष्ट भूमिका मतदारांना भावत आहे.
दोन्ही उमेदवार निवडून येणे आवश्यक वाळुज गटाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती – दोन्ही स्तरांवर सक्षम प्रतिनिधित्व गरजेचे आहे. त्यामुळे बालाजी सोनटक्के आणि आशाबाई संजय शिंदे हे दोन्ही उमेदवार निवडून यावेत, अशी भावना मतदारांमध्ये बळावत आहे. महायुतीच्या एकजुटीमुळे विकासाचा मार्ग अधिक वेगाने खुला होईल, असा विश्वास जनतेत दृढ होत आहे.
वाळुज गटातील मतदारांनी या विकासाभिमुख, अनुभवी आणि लोकाभिमुख नेतृत्वाला साथ देऊन परिवर्तनाचा कौल द्यावा—अशीच आजची जनभावना बोलकी ठरत आहे.

No comments:
Post a Comment