समाजसेवेचा राष्ट्रीय सम्मान ! भंडाऱ्यात-प्रविण भोंदे, सोमदेव चोपकर व सोपान रंगारी यांना २०२६ चा राष्ट्रीय गौरव आयकॉन अवॉर्ड



भंडारा (प्रतिनिधी):

केंद्रीय मानवाधिकार संघटन, नवी दिल्ली – महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने संविधान दिन, जागतिक मानवाधिकार दिन, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती, राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती चे औचित्य साधत भव्य संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाअंतर्गत संविधान सन्मान स्पर्धा परीक्षा–२०२५ मध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, भारतीय संविधान देऊ गुणगौरव करण्यात आले. तसेच समाजसेवेत निर्भीडपणे कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ पार पडला.

हा कार्यक्रम दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद सभागृह, भंडारा येथे उत्साहात पार पडला. यावेळी समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते प्रविण भोंदे, सोमदेव चोपकर व सोपान रंगारी यांना त्यांच्या कार्याची दखल घेत केंद्रीय मानवाधिकार संघटन, नवी दिल्ली चा २०२६ चा राष्ट्रीय गौरव आयकॉन अवॉर्ड प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

हा सन्मान केंद्रीय मानवाधिकार संघटन, नवी दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. देवानंद नंदागवळी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष ॲड. विजयकुमार कस्तुरे, जिल्हा सरकारी वकील ॲड. विनोद भोले, भंडारा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नितीन  रहांगडाले, जिल्हा परिषद चे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री चुरहे, डॉ खरात, डॉ महामुने, डॉ. पडद्यन, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ महाराष्ट्र राज्य चे उपमहासचिव सूर्यभान हुमणे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व भारतीय संविधानाची प्रत प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान संविधानाचे महत्त्व, मानवाधिकारांचे संरक्षण व समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा यावर मार्गदर्शन करण्यात आले.  अभिनंदन करण्यात येत आहे. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. देवानंद नंदागवळी यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. शीलवंतकुमार मडामे यांनी केले.

पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

No comments:

Post a Comment