तृतीयपंथी व्यक्तींसाठी हेल्पलाईन
✍🏻 दैनिक दर्पन प्रतिनिधी . पांडुरंग गायकवाड
छत्रपती संभाजीनगर, तृतीयपंथी व्यक्तींसाठी केंद्र सरकारने हेल्पलाइन तयार केली आहे. या हेल्पलाईनची सेवा विनामूल्य उपलब्ध असून १४४२७ हा या हेल्पलाईनचा क्रमांक आहे,सह सहायक आयुक्त समाजकल्याण आर.एम. शिंदे यांनी कळविले आहे.
केंद्र सरकारच्या ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्काचे संरक्षण) कायदा,२०१९ व नियम २०२० संपूर्ण लागू देशात लागू झाले आहेत. त्या अनुषंगाने तृतीयपंथीय समाजातील व्यक्तीसाठी केंद्र शासनामार्फत स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलवर तृतीयपंथीयासाठी नॅशनल हेल्पाइन क्रमांक-१४४२७ देण्यात आला आहे. तरी तृतीयपंथी व्यक्तींनी हेल्पलाइन चा वापर करावा असे आवाहन सहायक आयुक्त आर.एम. शिंदे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment