मुर्तिजापुर मध्ये राष्ट्रीय युवा सप्ताह व स्व . खाशाबा जाधव जयंती उत्साहात संपन्न .

 


प्रतिनिधी गजानन चव्हाण 

      मेरा युवा भारत केंद्र ,  अकोला युवा कार्यक्रम एव खेल  मंत्रालय भारत सरकार च्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती तथा राष्ट्रीय युवा सप्ताह स्व . खाशाबा दादासाहेक जाधव याच्या जयंती  निमित्त  नेहरू युवा बहुउद्देशीय क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कोकणवाडी  मेरा युवा भारत तालुका  समन्वयक विलास वानखडे यांनी रीतसर माहिती दिली  स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला युवक  असावा असा  विचाराचा प्रसार व प्रचार  पत्रका  मधून  शहरात युवकांना देण्यात आले कारण आजचा युवक वेगवेगळ्या तऱ्हेने वळत आहे  मोबाईलचे व्यसन डिप्रेशन अशा अनेक प्रकारच्या वेगळ्या दिशेने जात आहे करिता स्वामी विवेकानंद च्या विचार प्रत्येकाने मनात अंगीकारा वा असे चांगले गुणधर्म आत्मसात करणे  हाच एक उद्देश आहे तसेच स्व .खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या विषयी पण माहिती विषद करण्यात आली खाशाबा जाधव यांचा जन्म १५  जानेवारी १९२५  ला झाला त्याचे मुळ गाव  सातारा जिल्ह्यातील गोळेश्वर ,कराड येथील रहिवासी होते त्यांनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा मध्ये हेलसिकी येथे १९ ५२  मध्ये पहिले वैयक्तिक कुस्तीमध्ये पदक जिंकून क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली व आपल्या राज्याचे नाव लौकीक केले त्यामुळे त्यांच्या जयंतीदिनी राज्य क्रीडा दिन तथा  त्याची जयंती  क्रिडा प्रेमीनी सह  सर्वांनी  करावी  असे मत व्यक्त करण्यात आले  विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे क्रीडा शिक्षक ज्ञानेश टाले तालुका क्रीडा कार्यालयाचे विनोद काळबांडे सर्पमित्र मुन्ना श्रीवास मेजर फिटनेस ॲकडमीचे मंगेश तेलमोरे जी .के ॲकडमी चे   रवी गोंडकर फौजी फिटनेस ॲकडमी चे  मंगेश घुगे सिटी टायकोंडो चे दिनेश श्रीवास सामाजिक कार्यकर्ते श्री गजानन चव्हाण अक्षय वानखडे सह युवा युतीस सन्मानित करून युवा सप्ताहाची सांगता करण्यात आली .


No comments:

Post a Comment