खडका फाटा येथे शेत व शिवपाणंद रस्ता चळवळीची बैठक संपन्न; आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांचा सत्कार



.  दर्पण न्यूज :-नेवासा प्रतिनिधीश्रीनाथाभाऊ  शिंदे 

नेवासा तालुक्यातील खडका फाटा येथे रविवार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी 'महाराष्ट्र राज्य शेत व शिवपाणंद रस्ता चळवळी'ची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत चळवळीच्या पुढील वाटचालीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या रस्त्यांचा प्रश्न प्रभावीपणे मांडल्याबद्दल आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला.

रस्त्यांच्या प्रश्नावर सभागृहात 'लक्षवेधी'

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. श्री. विठ्ठलराव लंघे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या शेत रस्त्यांबाबत सभागृहात 'लक्षवेधी' मांडली होती. या कार्याची दखल घेऊन, महाराष्ट्र राज्य शेत व शिवपाणंद रस्ता चळवळीचे अध्यक्ष श्री. शरद पवळे साहेब यांच्या हस्ते आमदार लंघे पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

चळवळीच्या कार्याचे आमदारांकडून कौतुक

आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी देखील यावेळी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपाणंद रस्ता चळवळीच्या कार्याचे मोठे कौतुक केले.

तसेच तालुक्याचे लाडके आमदार श्री विठ्ठलराव लंघे पाटील यांनी तालुकास्तरीय शेतपानंद रस्ता समितीवर श्री नाथाभाऊ शिंदे पाटील यांची निवड करीत असल्याबद्दल स्पष्ट केले

आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी अध्यक्ष शरद पवळे व उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे पाटील यांचा सत्कार करून चळवळीच्या पुढील संघर्षाला शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुक्यातील रस्ता पीडित शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या.

मान्यवरांची उपस्थिती

या प्रसंगी व्यासपीठावर खालील मान्यवर उपस्थित होते:

* श्री. शरद पवळे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शेत व शिवपाणंद रस्ता चळवळ)

* श्री. नाथाभाऊ शिंदे पाटील (राज्य उपाध्यक्ष)

* श्री. अंकुशराव काळे (अध्यक्ष, भाजपा किसान मोर्चा)

* श्री. रवींद्र खुडे (ज्येष्ठ पत्रकार)

* श्री. एकनाथ गटकळ (माजी सैनिक)

याशिवाय बाळासाहेब थोरात, संजय काळे सर, बापूराव काळे, सागर सोनटक्के सर, प्रशांत चौधरी, मनोहर मतकर, सोमा माकोणे, राम पवार, मुरलीधर जरे, कानिफनाथ कदम, रमेश भक्त, अमोल पवार, संभाजी पवार आणि विद्याताई पवळे मॅडम यांच्यासह नेवासा तालुक्यातील चळवळीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment