हजरत कमलपोस बाबा दर्गा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ऊरुष यात्रेला 5 फेब्रुवारीपासून भव्य प्रारंभ. होत आहे
दर्पण न्यूज आर्णी :प्रतिनिधी कृष्णा पोटे
या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर तयारी पूर्ण झाली असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे या यात्रेसाठी महाराष्ट्रसह इतर राज्यातूनही हजारो भाविक हजरत कमलपोस बाबा यांच्या दर्शनासाठी येतात बाबा यांच्या दर्ग्यात नतमस्तक झाल्यास मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे
यात्रेदरम्यान चादर अर्पण कवाली धार्मिक विधी तसेच विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे भाविकाच्या सो यीसाठी प्रशासन दर्गा समितीच्या वितीने स्वच्छता पाणीपुरवठा वीज आरोग्य सेवा व सुरक्षाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे यात्रेदरम्यान शांतता व सखोल राखण्याचे आवाहन दर्गा समिती व प्रशासनाने केला आहे हजरत कमलपोस बाबा दर्गा यात्रा ही सर्व धर्मीयये ऐक्याचे प्रतीक मानला जाते दरवर्षीप्रमाणे यंदाही ही यात्रा भक्ती भाव श्रद्धा आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे

No comments:
Post a Comment