राष्ट्रवादी काँग्रेस – उद्धव बाळासाहेब ठाकरे (उ.बा.ठा.) युतीमुळे वाळुंजमध्ये निवडणुकीची चुरस वाढली
वाळुंज महानगर प्रतिनिधी – पांडुरंग गायकवाड
सध्या राज्यभर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची धामधूम सुरू झाली असून वाळुंज परिसरातही राजकीय वातावरण तापू लागले आहे. वाळुंज जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. बालाजी रघुनाथ सोनटक्के यांनी निवडणूक रिंगणात दमदार एन्ट्री घेतली आहे. तर पंचायत समिती गटातून उद्धव बाळासाहेब ठाकरे (उ.बा.ठा.) पक्षाच्या श्रीमती आशाबाई संजू शिंदे या उमेदवार मैदानात उतरल्या आहेत.
या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व उ.बा.ठा. या दोन्ही पक्षांची अधिकृत युती झाल्यामुळे निवडणुकीत खरी चुरस निर्माण झाली आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आल्याने प्रचारासाठी मोठी ताकद निर्माण झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
आज वाळुंज येथील हॉटेल भोंडवे पॅलेस येथे युतीचा संयुक्त मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यास दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप नाना बनकर पाटील, ज्ञानेश्वर बोरकर, शेख जमिल भाई, योगेश आरगडे (उपसरपंच), नदीम भाई, बबन गायकवाड, रमेरा आरगडे, बाबासाहेब आरगडे, नासेर पटेल, मछिंद्र दळे पाटील, तात्यासाहेब देवढे पाटील, सचिन मुंढे, इस्माईल भाई, विश्वनाथ थोरात, बाळू चनघटे, पोपट बनकर आदी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी सर्वांनी एकजुटीने व जोमाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. युतीमुळे पक्षाला मोठी ताकद मिळाल्याचे मतही उपस्थितांनी व्यक्त केले. त्यामुळे येत्या निवडणुकीत वाळुंज गटात रंगतदार लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

No comments:
Post a Comment