स्नेहसम्मेलन विद्यार्थ्यासाठी सुप्त कलागुणांना वाव देणारा सोहळा –डॉ मनीषा निंबार्ते
पालांदूर :- स्नेहसम्मेलन विद्यार्थ्यासाठी सुप्त कलागुणांना वाव देणारा सोहळा असून त्याद्वारे त्यांच्या आवडीनिवडीनुसार कला सादर करण्याची संधी मिळते. अर्थातच त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणाचा विकास होण्यास असे कार्यक्रम उपयुक्त ठरतात. असे मत जि. प. सदस्या डॉ. मनीषा निंबार्ते यांनी प्रथम इंग्लिश मिडीअम कॉन्वेंट देवरी /गोंदी च्या स्नेहसंमेलन उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून व्यक्त केले. या कार्याक्रमाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक बुरडे यांनी केले यावेळी पंचायत समिती सभापती अश्विनी मोहतुरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी मंचावर पोलीस पाटील भाग्यवान शेंडे, ग्रा. प. सदस्य अनिल शिंदे, अंबर शिंदे, प्रवीण प्रधान, अंतुगिर गिरी, धनंजय शेंडे, कीर्ती शेंडे, ग्रा. प. सदस्या इंदू मेश्राम माजी पोलीस पाटील प्रधान, शिला बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे संचालक रवी मने, मुख्याध्यापिका दिपाली डोमळे उपस्थित होते.
पुढे निंबार्ते म्हणाल्या की, आई या शब्दात आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर आत्म्याचे ईश्वराशी मेळ म्हणजे आई त्यामुळे आईचे स्थान जीवनात महत्वाचे आहे. मुलांच्या विकासात शिक्षकाबरोबर आईचाही मोलाचा वाटा असतो. शिक्षणामुळे विद्यार्थ्यात नवनवीन कला विकसित होत असतात. विद्यार्थ्यात आत्मविश्वास वाढतो.
यावेळी मंचावरील उद्घाटक म्हणून विनायक बुरडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, जीवनात अपयश येतच राहतात मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यास नक्कीच यश मिळते. त्यामुळे आपण इच्छित ध्येय गाठू शकतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपाली डोमळे यांनी केले. कार्याक्रमाचे संचालन सुनिता पत्रे यांनी तर उपस्थितांचे आभार राहुल शेंडे यांनी मानले. यावेळी पालक व गावकरी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment