गोळवाडी गायरान क्षेत्रात लिबं झाडांची अनाधिकृत वृक्षतोड
प्रतिनिधी गहिनीनाथ वाघ
वैजापूर तालुक्यातील गोळवाडी गावांतर्गत असलेली सरकारी गायरान जमिनी अंदाजे क्षेत्र साठ एकर असून या गायरान जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची झाडे होते परंतु या गायरान जमिनीकडे महसूल विभागाचा कानाडोळा असल्यामुळे सर्रास वृक्षतोड करणाऱ्या चोर व संगणमत करून गायरान जमिनीवरील वृक्षतोड करणारे टोळी मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली आहे परंतु गायरान जमिनीचे देखभाल करण्यासाठी शासनाने महसूल विभाग तसेच वनविभाग नेमलेले आहे परंतु सर्व शासकीय कर्मचारी किंवा वनरक्षक विभाग झोपेचे सोंग घेतो का काय की संगणमत करून सरकारी गायरान क्षेत्रातील लिंबाची मोठमोठी झाडे तोडून विनापरवाना विक्री करत आहे ग्रामस्थांनी विचारणा केली असता आम्ही सर्वांना हप्ते देत असतो असे सांगण्यात आले
परंतु एकीकडे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी माध्यमांशी व पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते की वृक्षतोड झाल्यास 50000 रुपये दंड व कारवाई करण्यात येईल परंतु हा कायदा सर्वसामान्यांना लागू होतो की चोरून वृक्षतोड करणाऱ्यांनाही लागू होतो हे बघन आता चुरशीचे ठरणार आहे तसेच गायरानातील वृक्षतोड चालू आहे अशी माहिती मिळवताच महसूल अधिकारी तलाठी विकास भंडारी व मंडळ अधिकारी रीता पुरी यांनी तोडलेल्या झाडांची पाहणी केली पाहणी करून पुढील कारवाई करण्यात येईल असे माहिती दिली परंतु चोरट्याचे व्हिडिओ चित्रीकरण आणि फोटोग्राफी असूनही वृक्ष तोडणारे चोरटे खुलेआम वैजापूर मध्ये फिरताना दिसत आहे मग या झालेल्या वृक्षतोडीवर कारवाई होईल का असा प्रश्न ग्रामस्थांना पडलेला आहे गायरान जमिनीवरील वृक्षतोडीसंदर्भात महाराष्ट्रात महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम, 1964 लागू होतो.
या कायद्यांतर्गत गायरान किंवा कोणत्याही सरकारी जमिनीवरील झाडे तोडण्याबाबत खालील महत्त्वाचे नियम आहेतः
वृक्ष अधिकाऱ्याची परवानगीः जर गायरान जमिनीवर किंवा इतर कोणत्याही जमिनीवर वृक्षांची संख्या कमी असेल, तर वृक्ष अधिकाऱ्याच्या (Tree Officer) परवानगीशिवाय झाडे तोडता येत नाहीत.
अनधिकृत वृक्षतोडः परवानगीशिवाय झाडे तोडणे हा कायदेशीर गुन्हा आहे.
अनुसूचीत झाडे काही विशिष्ट
झाडे, जसे की साग, आंबा, जांभूळ, चिंच, चंदन, खैर, हिरडा इत्यादी तोडण्यासाठी वन विभागाची विशेष परवानगी आवश्यक असते.
अतिक्रमण आणि वृक्षतोडः गायरान जमिनीवर अतिक्रमण
करून झाडे तोडणे हे बेकायदेशीर आहे, ज्यावर उच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे.
थोडक्यातः गायरान जमिनीवरील झाडे तोडण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची (वृक्ष अधिकारी/वन विभाग) पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगीशिवाय तोडल्यास दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई होऊ शकते.

No comments:
Post a Comment