येणेगुर मध्ये प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष भव्य तिरंगा रॅली आणि विद्यार्थ्यांच्या वेशभूषा फेरी ने वेधले लक्ष



येणेगुर , ता, उमरगा, जि, धाराशिव भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वर्धापन दिनानिमित्त आज दि,26/01/2026 रोजी येणेगुर मध्ये अत्यंत उत्साहात आणि देश भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने स्थानिक हायटेक इंग्लिश स्कूल आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य तिरंगा रॅली आणि शालेय विद्यार्थ्यांची वेशभूषा फेरी काढण्यात आली होती.

आज सकाळी ठीक 9:30 वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन शिंदे साहेब पोलीस दुर क्षेत्र येणेगुर व येणेगुर गावचे प्रथम नागरिक सरपंच रेखाताई गुंजोटे , उपसरपंच बाबासाहेब गायकवाड यांनी ग्रामपंचायत कार्यालयात यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. रॅली ची सुरुवात 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम् च्या जय घोष करण्यात आली. या रॅली मध्ये शेकडो नागरिक हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या रॅली ने संपूर्ण गावचे वातावरण राष्ट्र भक्तीने भारावून टाकले होते.

शाळेतील लहानशा विद्यार्थ्यांनी महान क्रांतिकारी वेशभूषेतील 

या रॅली चे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांची वेशभूषा फेरी. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा थोर महापुरुषांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. काही विद्यार्थ्यांनी भारत माता यांची प्रतिकृती सादर करून उपस्थितांची मने जिंकली.


 महापुरुषांच्या वेषातील या मुलांची मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.


देशभक्तीपर संदेश

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सरस्वती मोरे यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व आणि लोकशाही मूल्यांची जोपासना करण्याबाबत मार्गदर्शन केले. आजच्या पिढीमध्ये राष्ट्रप्रेम जागृत राहावे या उद्देशाने ग्रामपंचायत अधिकारी एल जी कांबळे साहेब सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी या रॅलीच आयोजन करण्यात आले होते व तसेच ही रॅली ग्रामपंचायत कार्यालय समोर आल्यानंतर सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायतचे सदस्य यांनी वेशभूषेतील प्रमुख आकर्षक असलेले शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव , विद्यार्थ्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केल

कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी विद्यार्थ्यांना काही जणांनी खाऊचे वाटप करण्यात आले. स्थानिक पोलीस प्रशासन आणि गावचे प्रमुख नागरिक सरपंच, व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अशा कार्यकर्ते ग्रामपंचायत कार्यालयाचे कर्मचारी स्वयंसेवकांनी रॅलीदरम्यान चोख बंदोबस्त ठेवला होता. या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले

No comments:

Post a Comment