'रन फॉर वरणगांव’ मॅरेथॉन मधून 'वरणगाव सिव्हील सोसायटी' चा सर्वांसाठी उत्तम आरोग्याचा संदेश
प्रतिनिधी - गोपाळकुमार कळसकर.
भुसावळ: धावण्याच्या प्रत्येक पावलातूनउत्तम आरोग्याचा संदेश देणारी आणि समाजात सकारात्मक उर्जा निर्माण करणारी मॅरेथॉन स्पर्धा शिवसृष्टी पार्क, वरणगांव येथे १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आली आहे. 'सर्वांसाठी उत्तम आरोग्य' या संकल्पनेवर आधारित ही मॅरेथॉन स्पर्धा यंदा चौथे वर्ष गाठत असून यावर्षी स्पर्धकांचा उत्साह व सर्धेची व्याप्ती वाढलेली दिसून येत आहे. जळगांव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेला धावपटूंनी नाव नोंदणी केलेली आहे. यामुळे यंदा ही स्पर्धा लक्षवेधी ठरणार आहे. या स्पर्धेला ना. संजय सावकारे (वस्त्रोद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य ) यांचे विशेष सहकार्य लाभले असून त्यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभणार आहे. तसेच साईजीवन सुपर शॉपि ,गोल्ड सिटी हॉस्पिटल, मानवतकर हॉस्पिटल, साई ज्वेलर्स, महाराष्ट्र ग्रामीण बँक, सप्तशृंगी डेअरी, एनरझल ड्रिंक आणि ऑक्सि स्प्रिंग ड्रिंकिंग वॉटर यांचे योगदान लाभत आहे. या मॅरेथॉनसाठी डॉ.चारुलता पाटील व गनसिंग पाटील यांची ब्रँड अम्बेसिडर म्हणून निवड केलेली आहे.स्पर्धेपूर्वी उत्साह वाढवण्यासाठी मॅरेथॉनचे टी शर्ट व किटचे २७ जानेवारीला सायंकाळी ४ वाजता वरणगांव पोलीस ठाण्यातील सभागृहात अनावरण करण्यात येणार आहे. प्रत्येक सहभागी धावपटूस टी शर्ट, सहभाग प्रमाणपत्र स्मृतीपदक व रीफ्रेशमेंट देण्यात येणार आहे. ही स्पर्धा ५ किमी व १० किमी अशा दोन गटात असून महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र विभागणी केलेली आहे. स्पर्धेदरम्यान सुरक्षा व्यवस्था, मेडिकल सुविधा उपलब्ध असणार आहेत. या उपक्रमाचा लाभ घेत 'उत्तम आरोग्यासाठी एक पूल उचलुया' अशा शब्दात वरणगांव सिव्हील सोसायटी तर्फे डॉ.राहुल भोईटे व सर्व सदस्यांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

No comments:
Post a Comment