वनरक्षक बालाजी भुरके यांना राज्यस्तरीय गुणगौरव



प्रतिनिधी : गजानन वानोळे२६ जानेवारी २०२६  किनवट


नांदेड जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण वन विभाग, किनवट परिक्षेत्रात कार्यरत असलेले श्री. बालाजी शंकर भुरके वनरक्षक यांना त्यांच्या उत्कृष्ट वनसेवेबद्दल येत्या २६ जानेवारी रोजी पुणे येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयात राज्यस्तरीय गुणगौरवाणे सन्मानित करण्यात आले आहे.

वनसंरक्षण व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा सन्मान करण्यात येणार आहे. किनवट परिक्षेत्रात रस्ता दुतर्फा वृक्षारोपण, रोपवन विकासकामे, एक पेड माँ के नाम उपक्रम, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त बेलवन, पंचायत वन, पर्यटन स्थळी स्वच्छता मोहीम, स्वच्छता अभियान, जागतिक वनदिन, मेरी माटी मेरा देश, हरित सेना तसेच पर्यावरण अभियानांतर्गत शाळांमध्ये जनजागृतीचे कार्य त्यांनी प्रभावीपणे राबविले.

हे कार्य विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. संदीप बाबू चव्हाण, शुभांगी लोणकर मॅडम सहायक वनसंरक्षक, श्री. श्रीकांत जाधव सहायक वनसंरक्षक, संध्या  बगडे मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी आणि श्री. दिनकर पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले.

या कार्याची दखल घेत सामाजिक वनीकरण महाराष्ट्र राज्य पुणे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या तर्फे गुणगौरव करण्यात आला आहे या राज्यस्तरावर मिळालेल्या सन्माना बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तसेच या उपक्रमांना प्रसिद्धी दिल्याबद्दल सर्व दैनिक वर्तमानपत्रांचे वार्ताहर व मित्रपरिवारांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.



No comments:

Post a Comment