घावटे वस्ती (पिंपळाचा मळा) येथे 77 वा प्रजासत्ताक दीन उत्साहात साजरा.



दर्पण न्यूज (नेवासा) प्रतिनिधी - नवनाथ घावटे.

  घावटे वस्ती (पिंपळाचा मळा) येथे 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहा मध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संपूर्ण वस्तीवर प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रकाश घावटे यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ पार पडला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम व देशभक्ती पर भाषणे करत वातावरण देशभक्तीमय करून टाकले. 

  घावटे वस्तीवरील जेष्ठ नागरिक श्री मोहन काशिनाथ घावटे यांनी वयाच्या 67 व्या वर्षी पायी 'नर्मदा परिक्रमा' 91 दिवसा मध्ये 3500 किलोमीटर प्रवास करत पूर्ण केली त्या निमित्त शाळेचे शिक्षक श्री गायकवाड सर व शिक्षिका सातपुते मॅडम यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

  त्यानंतर वस्तीवरील ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला व मुलांना खाऊ वाटप करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी शिक्षक श्री गायकवाड सर यांनी सूत्रसंचालन व शिक्षिका सातपुते मॅडम यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

   यावेळी घावटे वस्तीवरील शालेय शिक्षण समिती अध्यक्ष नवनाथ घावटे, प्रकाश घावटे, बाबुराव घावटे, मोहन घावटे, भाऊसाहेब घावटे, जनार्दन घावटे, दीपक घावटे, नंदकुमार घावटे,विष्णू घावटे व शाळेचे आजी-माजी विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते..


No comments:

Post a Comment