वंचित बहुजन आघाडी महागाव तालुका कार्यकारिणीची बैठक प्रत्येक गावात पक्षाचे बुथ आवश्यक: डी.के. दामोधर (जिल्हा अध्यक्ष यवतमाळ,)
महागाव प्रतिनिधी अक्षय डोंगरे
महागाव: जिल्हाध्यक्ष डी.के दामोधर यांच्या प्रमुख उपस्थितीत व तालुका अध्यक्ष अंकुश कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह महागाव येथे घेण्यात आली नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर , मा.अंजलीताई आंबेडकर युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांचे व नवनियुक्त सर्व नगरसेवकांचे टाळ्या वाजवून अभिनंदन करण्यात आले.
तालुक्यात होऊ घातलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गावात पक्षाचे बुथ बांधून शाखा फलक लावण्याचे नियोजन करण्यात आले प्रत्येक पंचायत समिती गणाची बांधणी करण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या त्यागाचा विचार करून तालुक्यातील तमाम वंचित शोषित व सत्तेपासून वंचित असलेल्या तमाम समाजघटकांनी वंचित बहुजन आघाडी सोबत येऊन काम करावे यासाठी तालुका कार्यकारणीतील प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी गाव पातळीवर जाऊन पक्षाची बांधणी करण्याचे आदेश डी के दामोधर यांनी दिले या बैठकीला महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष वंदनाताई भवरे ,देवराव हरणे, गुणानंद मानकर, विलास पाईकराव, देवानंद खिल्लारे, नामदेवराव लहाने ,पप्पू कावळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन व आभार राजू नरवाडे यांनी केले.

No comments:
Post a Comment