मूर्तिजापूर मध्ये मतदार दिना निमित्त काढण्यात आलेल्या पदयात्रे मध्ये मेरा भारत केंद्राचा सहभाग .



 प्रतिनिधी गजानन चव्हाण 

  मतदार नोंदणी अधिकारी 032 मुर्तिजापुर (अ .जा. ) वि. स . म .स तथा विभागीय अधिकारी  मुर्तिजापुर यांच्या वतीने दिनांक २५  जानेवारी २०२६ ला 16 व्या मतदार दिना निमित्त काढण्यात आलेल्या पदयात्रा  मध्ये मेरा युवा भारत च्या सदस्यांनी सहभाग नोंदविला तहसीलदार शिल्पाताई बोबडे  मॅडम नायब तहसीलदार  श्री . राऊत साहेब तहसिल  निवडणूक कार्यालया चे श्री . महेश नागोलकर  साहेब यांनी  मतदार पदयात्रेला हिरवी झेंडी  दाखवून सुरुवात करण्यात आली श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून तहसील कार्यालय येथे समारोप करण्यात आला . मेरा युवा भारत कैद्रा च्या वतीने  स्लोगना व्दारे  जनजागृती  करण्यात आली त्यामध्ये माय भारत माय ओट , मेरा भारत मेरा भविष्य , मतदान आज मजबूत कल , मेरा वोट  मेरा स्वाभिमान , मै भी निभाऊंगा लोकतंत्र का धर्म , मेरा मत मेरी ताकत , नया मतदाता भारत भाग्य निर्माता , नागरिक मी भारताचा हक्क बजाज मतदानाचा , अश्या विविध घोष वाक्यान व्दारे मतदार जनजागृती करण्यात आली  आपल्या समोरपीय शासनामध्ये श्री अपार साहेब यांनी सर्व उपस्थित त्यांना मतदान विषयी मोलाचे मार्गदर्शन केले    कर्तव्यदक्ष उपविभागीय  अधिकारी श्री संदीप कुमार आपार  साहेब यांची भारत निवडणूक आयोगाच्या (E C  I ) माध्यमातून आंतरराष्ट्रीय परिषदेला जागतिक स्तरावर नेतृत्व  केल्या बद्दल त्यांचा मेरा युवा भारत तालुका समन्वयक विलास वानखडे  गजानन वरघट  गजानन चव्हान सह सत्कार करण्यात आला शेवटी मतदार जनजागृती शपथ देऊन राष्ट्रगीताने सदर कार्यक्रमाचा समारोप  करण्यात आला .

No comments:

Post a Comment