प्रधानमंत्री आवास योजना टप्पा २ अंतर्गत २१०८ घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा

 



प्रतिनिधी = गणेश ठाकरे लासलगाव 

निफाड तालुका : प्रधानमंत्री आवास योजना (टप्पा २) अंतर्गत निफाड तालुक्यातील एकूण ६८५० लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आलेली असून सर्व घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. यापैकी २१०८ घरकुलांचे बांधकाम आजरोजी पूर्ण झाले आहे.

यात पूर्ण झालेल्या घरकुलांचा तालुकास्तरीय गृहप्रवेश कार्यक्रम कोठुरे (ता. निफाड) येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात आज सोमवार दि.२६ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी १० वाजता ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर गृहप्रवेश सोहळा पार पडणार आहे. हा गृहप्रवेश कार्यक्रम आमदार दिलीप काका बनकर यांच्या हस्ते तसेच मोठ्या संख्येने लाभार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी श्रीमती नम्रता जगताप यांनी दिली. 


या योजनेमुळे वंचित व गरीब लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळत असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच निफाड तालुक्यातील नागरिकांनी व कोठुरे परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी जगताप यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment