सरपंचांनी केलेल्या कामाची पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दखल घेऊन त्यांना २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण
ता उमरगा प्रतिनिधी विश्वनाथ स्वामी
पंतप्रधान कार्यालयाकडून सरपंच अमर भगवान सूर्यवंशी यांना २६ जानेवारी चे विशेष निमंत्रण; गावाच्या विकासकामांची देशपातळीवर दखल जकेकुर वाडी,ता, उमरगा जि, धाराशिव, ग्रामीण विकासाचा आदर्श पॅटर्न राबवणाऱ्या जकेकुर वाडी गावच्या सरपंच अमर भगवान सूर्यवंशी यांच्या कार्याची थेट पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दखल घेतली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना आगामी २६ जानेवारी २०२६ रोजी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यासाठी 'विशेष निमंत्रित' म्हणून उपस्थित राहण्याचे अधिकृत निमंत्रण मिळाले आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून गौरव
पंतप्रधान कार्यालयाने सरपंच अमर भगवान सूर्यवंशी यांना पाठवलेल्या पत्रात त्यांच्या ,जलसंधारण, डिजिटल ग्राम, किंवा शून्य कचरा मोहिमेचा विशेष उल्लेख केला आहे. गावपातळीवर पारदर्शक कारभार आणि लोकसहभागातून शासकीय योजनांची केलेली प्रभावी अंमलबजावणी व तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासासाठी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत सायरन आवाजाचे नियोजन केले ते सायरन वाजल्यापासून गावातील टीव्ही मोबाईल व इतर इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करतात व तसेच विद्यार्थी त्या वेळेत अभ्यासाव्यतिरिक्त इतर काही कामात व्यस्त नसतात फक्त त्या वेळेत शैक्षणिक अभ्यास ग्रामस्थ ही त्यांच्या प्रत्येक निर्णयाचे स्वागतच करतात यामुळे त्यांची निवड करण्यात आली आहे. दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलन साठी आणि विशेष कार्यक्रमासाठी त्यांना हे निमंत्रण मिळाले आहे.
गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
या ऐतिहासिक निमंत्रण मुळे जकेकुर वाडी, ता,उमरगा,धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. एका लहानशा गावातील सरपंचाला थेट राजधानीत सन्मानाने बोलावले जाणे, ही संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची गोष्ट मानली जात आहे.
सरपंच ची प्रतिक्रिया
पंतप्रधान कार्यालयाने आमच्या गावच्या कामाची दखल घेतली आणि २६ जानेवारीच्या ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रण दिले, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. हे यश गावातील प्रत्येक नागरिकाच्या कष्टाचे फळ व तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे पंचायत अधिकारी व उपसरपंच व ग्रामपंचायत सहकारी सदस्य या सर्वांच्या सहकार्यामुळेच आज जिल्ह्यात राज्यातच नाही देशात आमच्या गावची व आमच्या कार्याची सन्माननीय पंतप्रधान साहेबांनी दखल घेतली अशी प्रतिक्रिया सरपंच अमर भगवान सूर्यवंशी यांनी दिली. या निवडीबद्दल जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि परिसरातील राजकीय व सामाजिक व परिसरातील मान्यवरांकडून सरपंच चे कौतुक होत आहे. येत्या काही दिवसांत सरपंच दिल्लीकडे रवाना होणार असून संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण आहे.

No comments:
Post a Comment