कोठा शिवारात रात्री पाच डिसेंबर रोजी डुकरांचा धुमाकूळ
शेतकरी सुधाकर तायडे यांचे दोन एकर हरभरा पिक पूर्णपणे उद्ध्वस्त.शासनाच्या तातडीच्या मदतीची मागणी
रायखेड शिवार (कोठा) -
सर्वे क्र. 15/क येथे शेतकरी सुधाकर मधुकर तायडे यांच्या दोन एकर हरभरा पिकाचे गंभीर नुकसान झाले आहे. शेतात घुसलेल्या डुकरांच्या कळपाने मोठ्या प्रमाणात हरभरा उकरून फेकल्याने संपूर्ण पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकरी तायडे यांचे म्हणणे आहे की, "पहिल्याच पेरणीमध्ये पिक नीट उभं राहिलं नाही. आता डुकरांच्या हल्ल्यामुळे उरलेसुरले पिकसुद्धा नष्ट झाले. दुबार पेरणी करावी लागणार असून यासाठी शासनाची आर्थिक मदत आवश्यक आहे."
शेतातील नुकसानीमुळे तायडे यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यांनी शासनाकडे तातडीने नुकसानभरपाई तसेच दुबार पेरणीसाठी मदत मिळावी, अशी मागणी केली आहे (त कोठा) – रायखेड शिवारातील सर्वे क्रमांक 15/क मध्ये शेतकरी सुधाकर मधुकर तायडे यांच्या दोन एकरांवरील हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी शेतात घुसलेल्या डुकरांच्या कळपाने संपूर्ण पिक उकरून फेकत अक्षरशः हाहाकार माजवला. हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही हिरवे पिक शिल्लक राहिले नसल्याने तायडे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.
शेतकरी सुधाकर तायडे म्हणतात, “पहिल्याच पेरणीमध्ये पिक ठिकठाक उभं राहिलं नाही. तरीही उरलेल्या पिकावर आम्ही आशा ठेवून होतो. पण डुकरांच्या या हल्ल्यामुळे आमचं सम्पूर्ण श्रम पाण्यात शेतकरी सुधाकर तायडे म्हणतात,
“पहिल्याच पेरणीमध्ये पिक ठिकठाक उभं राहिलं नाही. तरीही उरलेल्या पिकावर आम्ही आशा ठेवून होतो. पण डुकरांच्या या हल्ल्यामुळे आमचं सम्पूर्ण श्रम पाण्यात गेलं. आता दुबार पेरणी वगळता दुसरा मार्ग नाही. पण त्यासाठी आर्थिक शक्ती संपली आहे. शासन मदत न दिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल.
”डुकरांच्या वाढत्या उपद्रवामुळे येथील अनेक शेतकऱ्यांचे पिक दरवर्षी उद्ध्वस्त होत आहे. मात्र, वनविभाग आणि प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याची सर्वसाधारण भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. नुकतेच तायडे यांच्या शेतात झालेल्या विध्वंसाने या प्रश्नाची तीव्रता पुन्हा एकदा समोर आली आहे.
तायडे यांनी शासनाकडे नुकसानभरपाई, दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत, तसेच डुकरांच्या उपद्रवावर त्वरित नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनीही हा प्रकार गंभीर असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे.रायखेड कोठा शिवारातील या घटनेने पिकांचे संरक्षण, वन्य प्राणी-मानव संघर्ष, तसेच शेतकरी सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.
आता शासन या प्रकरणाकडे कितपत गांभीर्याने पाहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment