महाराष्ट्र राज्य शासनाचा राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार दुसऱ्यांदा श्री लखन जाधव गुरुजी यांना प्रदान



प्रतिनिधी : गणेश ठाकरे लासलगाव 

श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी, श्री संत सेवा संघाचे साधक, सर्वोदय मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आणि सव्यसाचि गुरुकुलम् चे प्रधान आचार्य श्री लखन जाधव गुरुजी यांचा काल सांस्कृतिक मंत्री मा. श्री आशिषजी शेलार यांनी अतिशय सन्मानाने पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.हा पुरस्कार शिवकालीन युद्धकलेचा आहे. शिवकालीन युद्धकलेसाठी मिळालेला हा शासकीय सन्मान आहे याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे.

लखन गुरुजींनी भारतीय युद्धशास्त्र याविषयाचे सखोल प्रशिक्षण देणारे शस्त्र आणि शास्त्राचे ज्ञान भारतीय परंपरेवर आधारित देणाऱ्या सव्यसाचि गुरुकुलम् ची केलेली निर्मिती व या माध्यमातून देशातील युवा पिढीला संस्कारी, प्रखर देशभक्त, चारित्र्यवान व सामर्थ्यवान बनवण्याचे जे कार्य सुरू आहे त्याच बरोबर शिवकालीन युद्धकला आणि शिवकालीन शस्त्रांचा संग्रह करून त्याचे केलेले जतन, संवर्धन याच्या सन्मानार्थ हा पुरस्कार देण्यात आला.

*गुरुजींना दुसऱ्यांदा राज्यशासनाचा हा राज्य युवा पुरस्कार देण्यात आला....!*

काल मुंबईमधील प्रभादेवी येथील कलांगण, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे हा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. हा पुरस्कार महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री मा.श्री आशिषजी शेलार यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच *लखन गुरुजींचे मित्र शस्त्र संग्राहक श्री निलेश सकट यांनाही राज्य सांस्कृतिक युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील विविध कला, लोककला आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या जवळपास ९६ विजेत्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यामध्ये युवा व ज्येष्ठ असे दोन विभागात वितरण सोहळा पार पडला. पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह व एक लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला.

"हा अभूतपूर्व सोहळा मी जो अनुभवतोय तो केवळ केवळ पू.श्रीगुरुजींची कृपा आणि आजवर अत्यंत विपरीत स्थितीत अगदी पारतंत्र्याच्या काळातही या युद्धकलेचे जतन संवर्धन करून आमच्यापर्यंत हा क्षात्रतेजाचा वारसा पोहचविणारे मागच्या अनेक पिढ्यांचे वस्ताद, मार्गदर्शक ज्यांनी आम्हाला शस्त्र आणि शास्त्र याचे शिक्षण दिले ते आमचे गुरुवर्य, ज्यांनी आमच्यावर लेकरा सारखं प्रेम करून घडविले ते माझे गुरुजी, आमचे सगळे पालक मंडळी, माझी आई, पत्नी आणि सगळ्यात महत्त्वाचे माझे सगळे सवंगडी, सहकारी, गुरुबंधू, धारकरी बंधू, माझ्यावर जिवापाड प्रेम करणारे माझे विद्यार्थी आणि मित्र या सर्वांच्या आशीर्वाद, प्रेम आणि मार्गदर्शन यामुळेच हा पुरस्कार मिळतो आहे यावर खरा अधिकार हा यावरील मंडळींचा आहे तो त्यांच्या चरणी समर्पित." 

No comments:

Post a Comment