निफाड तालुका बनला बिबट्यांचे माहेरघर, देवगाव परिसरात पुन्हा वाढला बिबट्यांचा शिरकाव; बावीस दिवसांत तिसरा बिबट्या जेरबंद – ग्रामस्थांत भीतीचं सावट



प्रतिनिधी गणेश ठाकरे लासलगाव :

निफाड तालुक्यातील देवगाव परिसरातील बिबट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं सावट अधिकच दाट होत असताना, आज पहाटे येथील पोलीस पाटील सुनिल बोचरे यांच्या गट क्रमांक ४१४/२ मधील पिंजऱ्यात अंदाजे पाच वर्षे वयाचा नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला. बावीस दिवसांत हा तिसरा बिबट्या पकडला गेल्याने गावकऱ्यांत तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

   पहाटे पाचच्या सुमारास पिंजऱ्यात जोराची हालचाल झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व तत्काळ वनविभागाला पाचारण केले. काही दिवसांपासून या भागात बिबट्यांची वाढती वर्दळ असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

या आधी शरद जोशी यांच्या गट क्रमांक ४८५ मधील पिंजऱ्यात एक नरभक्षक बिबट्या जेरबंद झाला होता. तसेच नंतर चांगदेव शिंदे यांच्या गट क्रमांक १९१ मध्ये आणखी एक बिबट्या पकडला गेला होता. कमी कालावधीत तीन बिबट्यांचा शिरकाव उघड झाल्याने स्थानिक नागरिकांच्या भीतीत मोठी भर पडली आहे.

त्या घटनेनंतर ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी देवगाव–देवगाव फाटा मार्गावर रास्ता रोको करत, “जिवंत पकडून जंगलात सोडले तर तो परत गावातच येतो,” असा आरोप करत बिबट्याला ठार करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आजची नवी घटना पुन्हा चिंता वाढवणारी ठरली.बिबट्या जेरबंद झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. जनावरांवरील हल्ल्यांत वाढ, रात्री शेतात जाण्याचा धोका आणि सतत होणारी हालचाल यामुळे संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण आहे.

जंगलात सोडलेले बिबटे पुन्हा गावातच परततात. आमची भीती संपतच नाहीअशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.आज पहाटे बिबट्या जेरबंद झाल्यानंतर वनपरिक्षेत्रधिकारी राहुल घुगे  वनपाल मनमाड जयप्रकाश शिरसाठ वनरक्षक विंचूर विजय दोंदे  आधुनिक पथक निफाड सदस्य : भारत माळी, सागर दुसिंग, विजय माळी, शरद चांदोरे, सादिक शेख, काशिनाथ माळी, वैभव दौंड, मयूर गांगुर्डे,यांनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याला  

घटनास्थळी धाव घेऊन बिबट्‌याला ताब्यात घेतले. अद्यापही परिसरात आणखी बिबटे असल्याची नागरिकांची खात्री असून तातडीने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment