युनिटी मार्च/पदयात्रा मूर्तिजापूर येथे उत्साहात संपन्न
तालुका प्रतिनिधी गजानन चव्हाण
**प्रत्येकाने मतभेद,जात-पात विसरून एकात्मतेने नांदावे व देशाला एकात्मतेतून सशक्त व आत्मनिर्भर बनवावे - श्री संदीपकुमार अपार, उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर*
मुर्तिजापुर मध्ये रन फार युनिटी ला उत्कृष्ट प्रतिसाद . एकता दौड मधून दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश .लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांचे आदेशांन्वे मेरा युवा भारत केंद्र, अकोला ,उपविभागीय कार्यालय मुर्तिजापुर, तहसील कार्यालय मुर्तिजापुर यांच्या संयुक्तविद्यमाने दिनांक 21 /11/ 2025 रोजी सकाळी आठ वाजता मा.श्री संदीपकुमार अपार,उप विभागीय अधिकारी यांनी सदर पदयात्रेला हिरवी झेंडी दाखवत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरुवात झाली. यावेळी मुख्य अतिथी मा. शिल्पाताई बोबडे, तहसीलदार मूर्तिजापूर, महेश सिंह शेखावत,
जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत केन्द्र, अकोला , यांची मुख्य उपस्थिती लाभली. श्री .छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून पदयात्रेला सुरुवात होउन- श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय- भगतसिंग चौक मार्गे आठवडी बाजार- तहसील कार्यालय -तालुका क्रीडा संकुल, मूर्तिजापूर येथे समारोप करण्यात आला .अपार साहेब यांनी मुलांना मार्गदर्शन करत प्रत्येकाने मतभेद,जात-पात विसरून एकात्मतेने नांदावे व देशाला एकात्मतेतून सशक्त व आत्मनिर्भर बनवू या असा मोलाचा संदेश उपस्थित युवांना दिला. सरदार वल्लभाई पटेल यांच्या योगदानाला व कार्याला डोळ्यासमोर ठेऊन देशाच्या उज्वल भविष्यासाठी पदक्रमण करावे असे मत त्यांनी मांडले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध संदेशाचे फलक हाती घेऊन पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते. भारत माता की जय, वंदे मातरम, सरदार पटेलांच्या घोषणा देत पदयात्रा क्रीडा संकुल येथे पोहचली. उपस्थितांना आत्मनिर्भर भारत, नशा मुक्त भारत अभियान अशा शपथ घेऊन राष्ट्रगिताने पदयात्रेचा समारोप झाला. मेरा युवा भारत केंद्र, अकोला चे तालुका समन्वयक विलास वानखडे,विलास नसले यांनी पदयात्रेमध्ये भारतमातेच्या घोषणा देत उपस्थित विद्यार्थी युवायुती सह सर्वांचा जोश वाढविला . पदयात्रेमध्ये शासकीय कर्मचारी,कला ,क्रीडा, सांस्कृतिक ,सामाजिक ,पोलीस कर्मचारी ,पत्रकार बांधव , विविध शाळेचे प्राचार्य ,प्राध्यापक, शिक्षक, एनरजेटिक फिटनेस कल्ब ,पतंजली योग समिती, फौजी फिजिकल अकॅडमी , श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था सालतवाडा, जि के अँकडमी ,सोल्जर फिटनेस अकॅडमी इत्यादींनी सहभाग घेऊन एकता चे दर्शन घडविले प्रस्ताविक महेश सिंह शेखावत यांनी केले तर संचालन विलास नसले यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानेश टाले यांनी केले .

No comments:
Post a Comment