वृक्षांवर जादूटोणा सदृश्य प्रकार केल्याने, तपोवनातील अंनिसने केले प्रबोधन



प्रतिनिधी. : गणेश ठाकरे नाशिक

 तपोवनातील काही वृक्षांवर जादुटोणा करुन चिठ्ठया लावलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना आढळून आल्या.त्यांनी त्या काढून घेत उपस्थितांचे प्रबोधन केले.

               तपोवनातील वृक्षतोडी विरोधात अंदोलन सुरु आहे.इतर संघटनां प्रमाणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यास पाठिंबा दिला आहे. अंदोलनासाठी शनिवारी अनेक संघटनांचे कार्यकर्ते तपोवनातील जंगलात आले होते. अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे हेही तिथे हजर होते.चिपको अंदोलनाचा भाग म्हणून त्यांनी एका वृक्षाला मिठी मारली. त्यावेळी वृक्षाला चिठ्ठ्यांच्या पोंगळ्या अडकवलेल्या दिसल्या.त्या दोरीने वृक्षास बांधलेल्या होत्या.त्याबद्दल संशय आल्याने त्यांनी एक पोंगळी खोलून पाहिली.त्यात पंधरा-वीस चिठ्ठ्या आढळून आल्या. त्यावर उर्दु सारख्या भाषेत नकाशा व मजकुर लिहीलेला आढळला.मुस्लिम बांधवांकडून पडताळणी केली असता ते अरबी भाषेत लिहेलेले असल्याचे समजले.  सोबत तावीज असल्याने जादुटोणा असल्याची खात्री पटली.चांदगुडे यांनी आपले सहकारी राजेंद्र फेगडे व प्रल्हाद मिस्त्री यांच्या नजरेस ही बाब आणून दिली.प्रसार माध्यमांच्या समोर अंनिस कार्यकर्त्यांनी ते झाडापासून काढून घेतले व उपस्थितांचे प्रबोधन केले. कुणीतरी परप्रांतीय भोंदु मुल्ला मौलवींनी कदाचित हे कृत्य केल्याचा संशय आहे. एखाद्याचे  भले किंवा दुश्मनाचे वाईट करण्याच्या उद्देशाने सदर जादुटोणा केला असावा,असा संशय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.परंतु अशा कृत्याने व्यक्तीच्या जीवनावर कोणताही चांगला अथवा विपरीत परिनाम  होत नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. सदरचे कृत्य जादुटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा आहे मात्र सदरचे कृत्य अनेक महिन्यांपुर्वी केले असल्याने कुणी केले हे शोधणे अवघड आहे. त्यामुळे हे काढून घेत प्रबोधन करणे गरजेचे होते. कार्यकर्त्यांनी तसा करत यापासुन दुर राहण्याचे आवाहन केले.


" या प्रकरणाचा वृक्षातोड विरोधी आंदोलनाशी काहीही संबध नाही. अनेक महिन्यांपुर्वी केलेले असावे. लोकांनी अशा प्रकारच्या भोंदुंपासुन सावध रहावे.कुणाची फसवणूक झाली असल्यास पोलीसांशी अथवा अंनिसशी संपर्क साधावा"-कृष्णा चांदगुडे,राज्य कार्यवाह, अंनिस

अधिक माहितीसाठी

कृष्णा चांदगुडे,9822630378

No comments:

Post a Comment