महाभारत मालिकेतील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांची कर्करोगाशी झुंज अपयशी



पंकज धीर ६८ वर्षांचे होते. पंकज यांना कर्करोग झाला होता, त्यावर त्यांनी मात केली होती. पण काही महिन्यांपूर्वी त्यांना पुन्हा कॅन्सरचं निदान झालं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली. त्यांच्यावर उपचारादरम्यान मोठी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. पण पंकज यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि आज त्यांचे निधन झाले.

पंकज धीर यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार

वृत्तानुसार, अभिनेता पंकज धीर यांच्यावर आज (१५ ऑक्टोबर) मुंबईतील विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार लवकरच केले जातील. त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र, तसेच इंडस्ट्रीतील कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी जात आहेत.

पंकज धीर हे त्यांचा उत्तम अभिनय व भारदस्त आवाजासाठी ओळखले जायचे. पंकज यांनी 'सडक', 'सोल्जर' आणि 'बादशाह' यासह इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. पण त्यांना खरी लोकप्रियता १९८८ च्या ऐतिहासिक 'महाभारत' मालिकेमुळे मिळाली. 'महाभारत' मधील कर्णाच्या भूमिकेमुळे पंकज धीर यांना प्रसिद्धी मिळाली.

पंकज धीर यांचा मुलगा निकितन धीर हा देखील एक लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. निकितनच्या 'जोधा अकबर' आणि 'चेन्नई एक्सप्रेस' मधील त्याच्या भूमिकांसाठी विशेष ओळखला जातो.


No comments:

Post a Comment