चांदोरी बसस्थानकात गार्गीने दाखवला जनजागृतीचा आदर्श, नाशिक ग्रामीण पोलिसांचा ‘डायल ११२’ जनजागृती व्हिडीओ प्रसिद्ध



 प्रतिनिधी. गणेश ठाकरे लासलगाव,,

- आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने नाशिक ग्रामीण पोलिसांनी ‘डायल ११२’ या सेवा क्रमांकाविषयी जनजागृतीसाठी आकर्षक व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओतून पोलिस, अग्निशमन दल आणि वैद्यकीय सेवांचा त्वरित लाभ एका फोनवर कसा मिळू शकतो, याची प्रभावी मांडणी करण्यात आली आहे.

    चांदोरी बसस्थानकावर चित्रीत या लघुपटात काही गुंड प्रवृत्तीचे युवक कॉलेजमधील मुलींना छेडतात. त्याचवेळी बसस्थानकातील जाहिरात फलकावर ‘डायल ११२’चा संदेश पाहून चिमुकली गार्गी आपल्या आईच्या फोनवरून ११२ क्रमांक डायल करते. काही क्षणांतच सायखेडा पोलिस घटनास्थळी दाखल होतात आणि आरोपींना पकडतात. या प्रसंगातून नागरिकांनी संकटाच्या क्षणी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा हा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला आहे.

     नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक मा. बाळासाहेब पाटील (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.सुनील पाटील यांच्या संकल्पनेतून हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून नागरिकांमध्ये सुरक्षा, जबाबदारी आणि पोलिसांबद्दलचा विश्वास दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

   हा जनजागृती व्हिडीओ नाशिक ग्रामीण पोलिसांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध आहे.

“संकटाच्या क्षणी घाबरू नका, फक्त ११२ वर कॉल करा,” असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment