२१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन शास्त्रसंमतच!



दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला दिवाळीचा सण साजरा होतो.  धनत्रयोदशीपासूनच याची सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या दिवशी भगवान गणेश आणि माता लक्ष्मीची पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धी येते आणि धन-धान्यात वाढ होते. पण दिवाळी पूजेच्या वेळी काही विशेष गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. नाहीतर तुमची पूजा अपूर्ण राहू शकते.२१ ऑक्टोबर रोजी अमावास्या १७:५५ पर्यंत असून, ती तीन प्रहरापेक्षा जास्त आहे, तसेच प्रतिपदा २०:११ वाजता समाप्त होईल. म्हणून, या दिवशी लक्ष्मीपूजन शास्त्रविधानानुसार योग्य आहे.


यासंदर्भात, २१ ऑक्टोबर २०२५ रोजी मंगळवारी सायंकाळी व प्रदोषकाळात (सूर्यास्तानंतर २ तास २४ मिनिटे) लक्ष्मीपूजन करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. गेल्या काही वर्षापासून सोशल मीडियावर लक्ष्मीपूजनाबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही लोक गणित पद्धतीच्या फरकामुळे आणि धर्मशास्त्रीय वचनांचा योग्य अर्थ न लावल्यामुळे २१ ऑक्टोबरऐवजी दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन करण्याचे संदेश देत आहेत. अशा अफवांपासून दूर राहून ज्याच्याशी आपण आपल्या धार्मिक कृत्यांसाठी पंचांगाचा वापर करतो, त्याच पंचांगानुसार लक्ष्मीपूजन करा. २१ ऑक्टोबर २०२५ रोजी लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त दुपारी ३ ते ४:३० आणि सायंकाळी ६ ते ८:४० असा असल्याची माहिती  देण्यात आली.


दिवाळीत लक्ष्मीपूजन का करतात?

आश्विन वद्य अमावास्येला लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे. या दिवशी बलीच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका झाली होती आणि त्याच आनंदात लक्ष्मीपूजन केले जाते, अशी एक आख्यायिका आहे. लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात नेहमी राहावे यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन केले जाते. त्याच कारणामुळे व्यापारी लोकही या दिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करतात. दिवाळीत लक्ष्मीपूजन का केले जाते याबाबत अनेक आख्यायिका प्रचलित आहेत.

कोणत्या दिशेला पूजा मांडावी?

दिवाळीच्या दिवशी पूजा करताना दिशेचे विशेष भान ठेवावे. असे मानले जाते की पूजा नेहमी उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेलाच करावी. संपूर्ण कुटुंबासोबत दिवाळीची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि सर्व सदस्यांवर माता लक्ष्मीची कृपा राहते. तसेच, पूजा करताना या गोष्टीचीही काळजी घ्या की पूजा करणाऱ्या व्यक्तीचे तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे.

दिवाळी पूजेसाठी कोणत्या देवांची मूर्ती घ्यावी

दरवर्षी दिवाळी पूजेसाठी आपण लक्ष्मी आणि गणेश यांच्या मूर्ती विकत घेतो. त्यावेळी या गोष्टीची काळजी घ्यावी की मूर्ती मातीच्या असाव्यात आणि माता लक्ष्मी व गणेशजी यांच्या मूर्ती एकत्र जोडलेल्या नसाव्यात. लक्ष्मी-गणेश यांच्या मूर्ती घेताना या गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.तसेच, जुन्या मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित कराव्यात. दोन्ही मूर्ती वेगवेगळ्या घेऊन त्यांची चौरंगावर मांडणी करून विधिवत पूजा करावी.

देवी लक्ष्मीची मूर्ती कशी असावी

दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीची मूर्ती घेताना या गोष्टीची काळजी घ्यावी की देवी बसलेल्या स्थितीत असावी आणि तिच्या हातातून धन बरसताना दाखवले असावे. तसेच, माता लक्ष्मीने लाल रंगाचे वस्त्र परिधान केलेले असावे आणि ती कमळाच्या आसनावर विराजमान असावी. अशा प्रकारची देवीची मूर्ती घरी आणणे खूप शुभ मानले जाते.

लक्ष्मी पूजनात या गोष्टी लक्षात ठेवा.

दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करताना उत्तर दिशेला दिवा लावणे शुभ मानले जाते. तसेच, देवीच्या पूजनात श्रीयंत्र, कौडी आणि गोमती चक्र अवश्य ठेवावे. त्यानंतर, प्रदोष काळात शुभमुहूर्तावर विधी-विधानाने माता लक्ष्मीची पूजा व आरती करावी.

अशी आहे यंदाची दीपावली

1) गुरु द्वादशी, धनत्रयोदशी, यमदीपदान : १८ ऑक्टोबर २०२५, शनिवार

2) नरक चतुर्दशी, अभ्यंग स्नान, यम तर्पण : २० ऑक्टोबर २०२५, सोमवार

3) लक्ष्मीपूजन : २१ ऑक्टोबर २०२५, मंगळवार

4) लक्ष्मीपूजन मुहूर्त: २१ ऑक्टोबर २०२५, मंगळवार दुपारी ३ ते ४:३०, सायं. ६ ते ८:४०

5) वहीपूजन मुहूर्त : २२ ऑक्टोबर २०२५, बुधवार

6) यमद्वितीया (भाऊबीज) : २३ ऑक्टोबर २०२५, गुरुवार


No comments:

Post a Comment