छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर ..
चिचघाट गावात थेट तहसीलदारांची उपस्थिती..
कुही – “शासन तुमच्या दारी, समाधान तुमच्या हाती” या घोषवाक्याला प्रत्यक्षात उतरवत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन मौजा चिचघाट येथे करण्यात आले. या शिबिरात तहसीलदार मा. अमित घाटगे साहेब आणि नायब तहसीलदार निकाळजे साहेब यांनी स्वतः हजेरी लावून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.शिबिरादरम्यान नागरिकांनी महसुली प्रश्नांबाबत थेट तक्रारी मांडल्या. काही समस्या प्रत्यक्ष जागेवर
च सोडविण्यात आल्या तर काही अर्ज नोंदवून त्वरित कार्यवाहीसाठी आदेश देण्यात आले. यामुळे गावकऱ्यांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली.हा उपक्रम केवळ शासकीय कामकाजापुरता मर्यादित न राहता नागरिक आणि प्रशासन यांच्यातील विश्वासाचे नाते दृढ करणारा ठरला. महसूल विभागाच्या या जनसंपर्क उपक्रमामुळे गावकऱ्यांना दरवेळी तहसील कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही.शासनाच्या लोकाभिमुख प्रशासन संकल्पनेतून राबविण्यात येणारे हे शिबिर नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरत असून, “शासन तुमच्या दारी – समाधान तुमच्या हाती” या संकल्पनेला खरी झळाळी मिळत असल्याचे प्रतिपादन या शिबिराच्या निमित्ताने झाले.
No comments:
Post a Comment