कुही येथे लोककला शाहिरी मेळावा उत्साहात पार..


 

कुही तालुका प्रतिनिधी - जितेंद्र गोंडाणे 

                    लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कुही येथे लोककला शाहिरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विविध लोककलांच्या रंगतदार सादरीकरणांनी कार्यक्रम रंगला.  मेळाव्याचे उद्घाटन सौरभ दंडारे यांनी केले. अध्यक्षस्थानी आस्तिक सहारे होते. यावेळी चंद्रकांत वानखेडे, वामन श्रीरामे, सचिन पुडके, सज्जन पाटील, हरिदास लुटे, कैलास थोटे, रामभाऊ क्षीरसागर, रमेश लांजेवार, नलू शेंडे उपस्थित होते. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन साई सर्वांगीण ग्रामीण विकास संस्था कुही, ऑरेंज सिटी बहुउद्देशीय संस्था विहीरगाव नागपूर, मानसी सांस्कृतिक कला मंडळ मुसळगाव, अजित बालक मंदिर वाडी, मागासवर्गीय गोपाळ समाज कल्याणकारी संस्था माहुरझरी व सम्यक संदेश फाउंडेशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.यावेळी जिल्ह्यातील मान्यवर कलावंतांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सन्मानित कलावंतांमध्ये शाहीर पुरुषोत्तम खांडेकर, निनाद बागडे, मंगेश शेंडे, गंगाधर शेंडे, भाऊराव शेंडे, रोमदेव शेबे, धर्मपाल डोंगरे यांचा समावेश होता.मेळाव्यात पोवाडा, भारुड, तमाशा, गोंधळ, डायका, नृत्य यांसारख्या विविध लोककलांचे सादरीकरण झाले. प्रास्ताविक डॉ. आनंद खडसे यांनी केले, तर संचालन व आभार प्रदर्शन शाहीर कालीचरण शेंडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment