बोटोणा गावात इरखेडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी
प्रतिनिधी, उमेश गिरमकर
कांरजा तालुक्यातील बोटोणा या गावांमध्ये ह. भ. प.चपंत महाराज इरखेडे महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली चपंत महाराज यांनी आपले संपुर्ण आयुष्य श्री संत कमळगिर महाराज यांच्या सेवेत अर्पण केले एक निष्ठेने मनोभावे महाराजाची सेवा केली व रक्षाबंधन च्या दिवशी समाधीस्ट झाले त्यानिमित्त चपंत महाराज यांना श्री संत कमळगिर महाराज यांच्या मंदिर परिसरात समाधी देण्यात आली.त्यानिमित्य दरवर्षी प्रमाणे रक्षाबंधन च्या दिवशी चपंत महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येते त्यानिमित्त दि.08/08/2025 ला सायंकाळी ह.भ.प.कुणाल महाराज कोडे यांचे कीर्तन व प्रवचन ठेवण्यात आले होते व ह्या कार्यक्रमाचे आयोजन श्री.लेखनदास इरखेडे, सुभाष इरखेडे, सदाशिव इरखेडे, निलेश कामडे,सुरेश शेटे, अशोक इरखेडे इत्यादी ने केले व श्री संत कमळगिर महाराज भजन मंडळ बोटोणा यांनी भजन व काल्याचे कीर्तन करून पुण्यतिथी उत्साहाची सांगता केली यामध्ये धर्मेंद्र सकर्डे,महेश चावरकर,सांरग मोहीते, पिंटू डेहनकर,अनुज तावरे यांनी सहभाग घेतला व महाप्रसाद वितरण करण्यात आला
No comments:
Post a Comment