9 ऑगस्ट क्रांतिदिन व जागतिक आदिवासी दिन साजरा
संतोष साळुंके नाशिक प्रतिनिधी
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या अध्यक्षतेखाली 9 ऑगस्ट क्रांतिदिन व जागतिक आदिवासी दिन साजरा घेण्यात आला.याप्रसंगी उपमुख्याध्यापक विजय मापारी,पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, शशिकांत दंडगव्हाळ , शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर, ज्येष्ठ शिक्षक दिलीप पवार , मंगला मुसळे, कैलास पाटील, सुनंदा कुलकर्णी , हेमंत भुसारे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी ,पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन इ 10 वी ब च्या वर्गाने केले.त्यांना वर्गशिक्षिका निरुपमा ठाकूर यांनी सहकार्य केले.या प्रसंगी पर्यवेक्षक सूर्यभान जगताप तसेच जेष्ठ शिक्षक कैलास पाटील, साक्षी देसले, रत्नदीप सोनवणे ,आदित्य पाटील ,मानसी पाटील, पूर्वा पाटील ,पल्लवी भामरे, जान्हवीसपकाळे यांनी क्रांती दिन तसेच आदिवासी दिनाची माहिती विद्यार्थ्याना सांगितली .तसेच आर्या महाले व सृष्टी शिंपी यांनी रक्षाबंधन या सणाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.या दिनानिमत्ताने इ 10 वी ब चे विद्यार्थी रोहन दुसाने व प्रणव चव्हाण यांनी क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित नाटिका तसेच विद्यार्थांनी आदिवासी समूहगीत सादर केले.
संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे व मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी कार्यक्रमास शुभेच्या दिल्या .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलोनी सोनवणे हिने केले.
No comments:
Post a Comment