भिसी येथे व्यापारी संकुल बांधकामाचे भुमीपुजन संपन्न.



प्रतिनिधी : - 


         भिसी येथील महात्मा गांधी स्मारक चाळ येथे व्यापारी बांधवांसाठी व्यापारी संकुल बांधकामाचे भुमीपुजन संपन्न झाले. पुढील काही महीण्यात सर्व सुवीधा युक्त असे 40 दुकान असलेले व्यापारी संकुल येथील व्यापारी बांधवांना व्यवसायासाठी उपलब्ध होणार आहे.

                भिसी नगरपंचायतच्या मुख्याधिकारी  अर्चना वंजारी यांच्या आदेशाने 28 फेब्रुवारी ते 21 एप्रील 2025 या दरम्यान  भिसी येथील अतीक्रमण भुईसपाट करण्यात आले त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे धंदे मोडकडीस आले मात्र चिमुर विधानसभेचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथान महाअभीयान योजने अंतर्गत दुकान गाळे बांधकाम साठी 2 कोटी 12 लक्ष 72 हजार रुपये निधी मंजूर करून भिसी येथील म.गांधी स्मारक चाळ येथे व्यापारी संकुल बांधकामाची मंजुरी मिळवून दिली.महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथान महाअभियान योजने अंतर्गत 2 कोटी 72 लक्ष रुपये निधीतून खाली व वर असे एकुण 4O दुकान गाळ्यांचे बांधकाम करण्यात येणार असुन त्यात महीला , पुरुष यांना शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था सुद्धा असणार आहे.

             भिसी नगर पंचायत च्या वतीने गाळे बांधकामाचा भुमीपुजन सोहळा दि.7 ऑगस्ट ला संपन्न झाला. भाजप चे जेष्ट नेते माजी राज्यमंत्री रमेशकुमार गजबे यांच्या हस्ते फित कापून भुमीपुजन करण्यात आले.या व्यापारी संकुलाच्या बांधकामामुळे 4O व्यापारी बांधवाना दिलासा मिळणार असुन व्यापारी बांधवांनी आमदार भांगडीया यांचे आभार मानले आहे. भुमीपुजन कार्यक्रमात येथील व्यापारी बांधव, भाजप कार्यकर्ते, नागरीक व नगर पंचायत कर्मचारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment