बोरगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये ग्रंथ व वृक्षदिंडी चे आयोजन

 



बोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने काढली दिंडी; विठ्ठल नामाच्या जपाबरोबरच विद्यार्थ्यांकडून पर्यावरण संरक्षणांची जनजागृती.



 टेंभुर्णी प्रतिनिधी  विष्णु मगर 

 जाफराबाद तालुक्यातील बोरगाव बु् येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने वृक्ष व ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संपूर्ण गावचे वातावरण भक्तिमय झाले होते . रविवारी आषाढी एकादशी असल्याने संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलाच्या भक्तीने न्हावून निघाला आहे. त्या अनुषंगाने विज्ञान व अध्यात्माची सांगड घालत बोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री बी.एल देशमुख व सर्व शिक्षकांच्या समन्वयाने ह्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थी व गावकरी सहभागी होत दिंडीचा भक्तीमय वातावरणात आनंद लुटला.

या दिंडीत सुंदर फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये विठ्ठल रखुमाईची मूर्ती,विविध झाडांची रोपे भारतीय संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती.शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुखुमाई, विणेकरी ,टाळकरी, वारकरी इत्यादी वेशभूषेत या दिंडीत सक्रिय सहभाग घेतला होता गावातील महिलांनी मनोभावे विठ्ठल-रूखमाईच्या  पालखीची घरोघरी पूजा केली.संपूर्ण गावातील घरांसमोर सुंदर रांगोळ्या काढण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकात गावकऱ्यांनी शिवरायांचा पोवाडा सादर केला. वारकरी महिला भगिनींनी टाळ वाजवून पावल्या टाकत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. विद्यार्थ्यांनी देखील फुगड्या खेळत पावल्या टाकत दिंडीचा आनंद लुटला.

याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक, शालेय शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच,उपसरपंच यांच्यासह महिलांसह ग्रामस्थ, व युवकांची मोठी उपस्थिती होती.

दिंडीमध्ये विद्यार्थ्यांकडून जनजागृती ....

'पुस्तक म्हणजे मन निर्माण करणारा झरा ',करू रक्षण झाडांचे साधेल कल्याण मानवाचे, "लेक वाचवा,लेक घडवा" जडतो तो जीव लागते ती आस आपली जिल्हा परिषद शाळाच आहे खास अशा फलकांनी सर्व गावकऱ्यांचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.

चिमुकल्यांच्या वेशभूषाने  वेधले लक्ष...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव बु् यांच्या वतीने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांच्या विठ्ठल-रखुमाई,साधु संतांच्या वेशभूषाणे गावकऱ्यांचे लक्ष वेधले

No comments:

Post a Comment