बोगस बांधकाम कामगाराची होणार चौकशी.
बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.
नांदेड जिल्ह्यात होत असलेल्या बांधकाम कामगारांच्या नोंदणी प्रकरणात चौकशी करण्यासाठी लातूरची तीन सदस्य दक्षता समिती नांदेडमध्ये दाखल झाली आहे. बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी होऊ नये, यासाठी या समितीकडून पाहणी केली जाणार आहे. ही समिती जिल्ह्यात १० जुलैपर्यंत पाहणी करणार असून, काही तक्रारी असल्यास समितीकडे कराव्यात असे आवाहनही करण्यात आले आहे. प्रमाणपत्रांवरील आहे. शिक्के बनावट आहेत का याबाबतही तपासणी केली जाणार आहे. तसेच सीएससी केंद्रावरही होत असलेल्या नोंदणीची तपासणी केली जाणार आहे.
Labels:
तक्रार
No comments:
Post a Comment