भाजपा मंडल अध्यक्ष संतोष सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत वृक्षारोपण



ओझर:-नाशिक एज्युकेशन सोसायटी संचालित नवीन इंग्रजी शाळा ओझर येथे ओझर भाजपा मंडल अध्यक्ष संतोष सोनवणे यांच्या हस्ते शाळेत शंभर वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी संतोष सोनवणे यांनी मानवी जीवनात वृक्षाचे महत्व याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली तर शाळेचे मुख्याध्यापक विलास बैरागी यांनी संतोष सोनवणे यांना शुभेच्छा देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला यावेळी भाजपा ओझर मंडल चे पदाधिकारी तसेच ओझर गावातील नागरिक व शिक्षक उपस्थित होते 

No comments:

Post a Comment